Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी होणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना इतक्या उत्पन्नाची अट, अन्यथा मिळणार नाही योजनेचा लाभ, आदिती तटकरेंनी दिली माहिती
मुंबई : लाडकी बहीण योजनेमुळे देशभरातील लाखो महिलांना मोठा फायदा झाला. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये येत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेरतपासणी होणार आहे. यासंदर्भात आतापर्यंत फक्त चर्चा सुरू होती, मात्र आता फेरतपासणी होणार असल्याचं अदिती तटकरे यांनी स्वत: सांगितलं आहे.
लाडकी बहीणच्या योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले, अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या तिथे, फेरतपासणी होतच आहे. मात्र आता सगळ्यांचीच फेरतपासणी होणार असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही अद्यापही काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीनं होणार आहे.
अडीच लाखहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता फेरतपासणीत जर अशा महिला आढळल्या तर त्यांना यानंतर खात्यावर पैसे येणार नाहीत अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.
advertisement
- काय आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 02, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी होणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय