'ती गप्प आहे म्हणून मी वाचलो', जिच्यासोबत जोडलं नाव, गोविंदाने गायचे तिचेच गुणगाण; सुनीता आहुजाच्या आरोपांवर म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सुनीता आहूजा हिने काही दिवसांपूर्वी गोविंदाचे कोणासोबत तरी अफेअर सुरू असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. गोविंदाने अखेर आपलं मौन सोडलं असून पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पत्नीच्या आरोपांवर बोलताना गोविंदा कमालीचा भावूक झाला. तो म्हणाला, "मी माझ्या करिअरमध्ये मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत आणि मिस युनिव्हर्ससोबतही काम केलं आहे. पण आजवर एकाही हिरोईनने माझ्यावर चुकीची नजर ठेवल्याचा किंवा अपशब्द वापरल्याचा आरोप केलेला नाही. जी मुलगी माझ्या घरी येतेय किंवा माझ्या प्रॉडक्शनमधून करिअरची सुरुवात करतेय, तिच्यासोबत मी कधीच चुकीचं वागणार नाही."
advertisement
गोविंदाने पुढे आपल्या परिस्थितीची तुलना एका बैलाशी केली. तो म्हणाला, "बैल आयुष्यभर काम करतो आणि म्हातारा झाला की त्याला खाटीकखान्यात पाठवलं जातं, तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडतंय. माझ्यावर आरोप करणारी व्यक्ती दुसरं कोणी नसून माझं बालपणीचं प्रेम सुनीता आहे. प्रेमाच्या बाबतीत माझ्या आयुष्यात कधीच गोष्टी सरळ राहिल्या नाहीत."
advertisement
सुनीताच्या या विधानांमुळे इंडस्ट्रीत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असं गोविंदाला वाटतं. त्याने नवीन येणाऱ्या कलाकारांची माफी मागितली आहे. "माझ्या नावामुळे कोणाच्या मनात भीती निर्माण झाली असेल, तर मी माफी मागतो. मला सर्वांसोबत काम करायचं आहे. कोणाला असं वाटू नये की गोविंदाच्या प्रॉडक्शनमध्ये काम करणं सुरक्षित नाही," असं त्याने स्पष्ट केलं.







