advertisement

Ranbir Kapoor: "आमच्यात खूप अंतर होतं…", वडीलांबद्दल बोलताना रणबीर कपूरने व्यक्त केली खंत; लेकीविषयी म्हणाला, "मला तिचा…"

Last Updated:

एका इव्हेंटमध्ये रणबीरने तो कशा पद्धतीने उत्तम वडील आहे, याबद्दल भाष्य केले आहे. सोबतच वडीलांसोबतच्या नात्याबद्दलही अभिनेत्याने भाष्य केले आहे.

News18
News18
मुंबई: रणबीर कपूरचा नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपट 2026 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. चाहते त्याच्या या आगामी बिग बजेट चित्रपटासाठी कमालीचे आतुर आहेत. अभिनयासाठी प्रकाशझोतात राहणारा रणबीर कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच एका बड्या ज्वेलरच्या ओपनिंग सेरेमनीसाठी अभिनेत्याने उपस्थिती लावली होती. या इव्हेंटमध्ये अभिनेत्याने तो कशा पद्धतीने उत्तम वडील आहे, याबद्दल भाष्य केले आहे. अनेक मुलाखतींमध्ये रणबीरने लेक राहाबद्दल भाष्य केले आहे. राहासोबतच्या बाँडविषयी सुद्धा अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
रणबीरने लिगेसी ज्वेलरी ब्रँडच्या उद्धाटन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात अभिनेत्याने तो सध्या पार पाडत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "माझ्या वडीलांमध्ये आणि माझ्यामध्ये फार अंतर होतं. शिवाय, आमच्यातलं नातंही फ्रेंडली नव्हतं. कारण, ती पिढीच तशी होती. त्याकाळी वडील- मुलांच्या नात्यामध्ये एक अंतर असायचं. पण आता माझं माझ्या लेकीसोबत नातं फार वेगळं आहे. मला आमच्यात तसं अंतर नकोय. मला तिचा मित्र व्हायचंय. तिला जे हवंय ते करण्यासाठी तिला पंख द्यायचे आहेत.”
advertisement
कपूर खानदानीमध्ये रणबीरचा जन्म झाला आहे. त्याचे कुटुंब फार मोठे आहे. कुटुंबाच्या वारशाबद्दल भाष्य करताना रणबीरने त्याचं मत मांडलंय की, "माझ्या बालपणी माझ्यावर केव्हाच प्रेशर टाकण्यात आला नाही. मला माहित होतं, मला सर्व परंपरेप्रमाणेच मिळणार आहे. तुम्हाला माहित असतं की, लाखो टॅलेंटेड सेलिब्रिटी फक्त एका संधीच्या शोधात असतात. पण मला तिच संधी माझ्या आजोबा- वडीलांकडून मिळाली आहे. ती संधी मला अगदी सोप्प्या पद्धतीने मिळालीये. त्यामुळे मी ती संधी हलक्यात नाही घेऊ शकत. मला भरपूर मेहनत घ्यावील लागणार आहे."
advertisement
"मला जसं आहे, तसंच राहावं लागेल. चांगली गोष्ट म्हणजे, मला खूप चांगल्या पद्धतीने जीवन मिळालं आहे, खूप चांगल्या पद्धतीने लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे मला हे सर्व समजते." अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने फॅमिली लेगेसी बद्दल दिली आहे. रणबीर कपूरचा नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपट 2026 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. तो या चित्रपटात प्रभू श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी व्यतिरिक्त चित्रपटात यश आणि सनी देओल सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत, रकुल प्रीत सिंग शूर्पणखाच्या भूमिकेत आणि काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये तर, दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये रिलीज होणार आहे. शिवाय, रणबीर कपूर संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ranbir Kapoor: "आमच्यात खूप अंतर होतं…", वडीलांबद्दल बोलताना रणबीर कपूरने व्यक्त केली खंत; लेकीविषयी म्हणाला, "मला तिचा…"
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement