TRENDING:

स्वस्त पर्सनल लोन हवंय? पाहा SBI, HDFC, ICICI सह टॉप 8 बँकांचे व्याज दर 

Last Updated:

पर्सनल लोन घ्यायचं असेल तर आधी व्याजदर चेक करणं गरजेचं असतं. कारण पर्सनल लोनला जास्त व्याजदर द्यावं लागतं. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

advertisement
नवी दिल्ली : आपण कितीही पैशांची बचत केली तरीही काहीना काही कारणामुळे आपल्याला लोनची गरज पडते. कधी हॉस्पीटलसाठी तर कधी तर कधी अचानक एखादी वस्तू घ्यावी लागली तर पर्सनल लोन हे फायदेशीर ठरते. पण पर्सन लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर चेक करणं गरजेचं असतं. भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँकसारख्या मोठ्या बँक या वेगवेगळ्या व्याजदरांवर लोन ऑफर करत आहेत.
पर्सनल लोन इंट्रेस्ट रेट
पर्सनल लोन इंट्रेस्ट रेट
advertisement

मार्च 2026 मध्ये पर्सन लोनचे व्याजदर हे जवळपास 8.75 टक्क्यांपासून तर 18 टक्केपर्यंत जात आहेत. हे पूर्णपणे तुमच्या क्रेडिट स्कोअर, उत्पन्नाचा सोर्स आणि सध्याच्या फायनेंशियल प्रोफाइलवर अवलंबून असते. म्हणूनच तुम्ही योग्य तुलना करुन स्वस्त EMI आणि कमी व्याजदर असलेले लोन निवडणे गरजेचं असतं. आज आपण टॉप 8 बँकांचे लेटेस्ट व्याजदर जाणून घेणार आहोत.

advertisement

SBI मध्ये 1 लाख जमा केल्यास मिळेल 52,991 रुपयांचं बंपर व्याज! तेही सरकारी गॅरंटीसह

प्रमुख बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फीस 

  • एचडीएफसी बँक : व्याजदर 9.99 पासून सुरू होतात, प्रोसेसिंग चार्जेंस 6,500 रुपयांपर्यंत
  • आयसीआयसीआय बँक : 9.99 टक्केपासून सुरू, प्रोसेसिंग चार्जेस लोन अमाउंटच्या 2 टक्केपर्यंत
  • कोटक महिंद्रा बँक : 10.99 टक्यांपासून सुरू, प्रोसेसिंग चार्ज 5 टक्केपर्यंत
  • advertisement

  • फेडरल बँक : 11.75 टक्क्यांपासून 18.99 टक्के, प्रोसेसिंग चार्ज 3 टक्केपर्यंत
  • भारतीय स्टेट बँक : 10.00 टक्के ते 15.00 टक्के, प्रोसेसिंग चार्ज 1.5 टक्केपर्यंत (1,000 रुपयांपासून तर 15,000 रुपये)
  • कॅनरा बँक : 9.70 टक्के ते 15.15 टक्के, प्रोसेसिंग चार्ज 0.5 टक्के (1,000 रुपये पासून 5,000 रुपये)
  • बँक ऑफ बडोदा : 10.15 टक्क्यांपासून 18.00 टक्के, प्रोसेसिंग चार्ज 2 टक्के ते (मॅक्सिमम 10,000 रुपये)
  • advertisement

  • यूनियन बँक ऑफ इंडिया : 8.75 टक्के ते 12.55 टक्के, प्रोसेसिंग चार्ज 1 टक्केपर्यंत (मॅक्सिमम 7,500 रुपये)

प्रीमियम फ्यूल एवढं महाग का असतं? नॉर्मल पेट्रोलपेक्षा त्यात काय वेगळं? घ्या जाणून

लोन घेताना आधी या 5 गोष्टींकडे ठेवा लक्ष 

  • व्याजाची तुलना : अर्था किंवा एक परसेंटचा फरकही तुमची लाखो रुपयांची बचत करु शकतो. नेहमी 3-4 बँकांचे व्याजदर पाहा. मगच कर्ज घ्या.
  • advertisement

  • प्रोसेसिंग फीसचं ओझं : अनेकदा व्याज कमी असते मात्र फाइल चार्ज (प्रोसेसिंग फीस) जास्त. हे आधीच क्लियर करा.
  • वेळ निवडा : लोन जेवढ्या दीर्घकाळासाठी घ्याल, ईएमआय तेवढाच कमी येईल, मात्र एकूण व्याज तेवढंच जास्त द्यावं लागेल.
  • सिबिल स्कोअर : तुमचा सिबिल स्कोअर 750 हून जास्त असेल तर तुम्ही बँकेकडून बार्गेनिंग करुन व्याजदर कमी करु शकता.
  • हिडन चार्ज : वेळेपूवी लोन बंद करण्यासाठी किंवा हप्ता उशीरा भरल्यावर किती दंड लागेल हे अवश्य चेक करा.

मराठी बातम्या/मनी/
स्वस्त पर्सनल लोन हवंय? पाहा SBI, HDFC, ICICI सह टॉप 8 बँकांचे व्याज दर 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल