TRENDING:

PhonePe ने लॉन्च केला डेंग्यू-मलेरियासाठी स्वस्त इन्शुरन्स, किंमत फक्त 59 रुपये

Last Updated:

PhonePe ने मंगळवारी डेंग्यू आणि मलेरियासाठी एक नवीन आणि परवडणारा इन्शुरन्स प्लॅन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत प्रति वर्ष फक्त 59 रुपये आहे.

advertisement
मुंबई : PhonePe ने नुकताच डेंग्यू आणि मलेरियासाठी एक नवीन आणि परवडणारा इन्शुरन्स प्लॅन योजना लॉन्च केला आहे. ज्याची किंमत प्रति वर्ष फक्त 59 रुपये आहे. हा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन डेंग्यू, मलेरिया आणि इतर हवेतून आणि डासांपासून पसरणाऱ्या आजारांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण प्रदान करते. विशेषत: टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये राहणारे लोक या विम्याद्वारे वर्षभरातील कोणताही अनपेक्षित मेडिकल खर्च टाळू शकतात.
फोनपे
फोनपे
advertisement

या प्लॅनमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, फायलेरियासिस, जपानी एन्सेफलायटीस, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, टायफॉइड, पल्मोनरी ट्यूबरक्लोसिस आणि मेनिन्जाइटिस यासारख्या 10 हून अधिक आजारांचा समावेश आहे. यामध्ये हॉस्पिटलायझेशन, चाचण्या आणि आयसीयूमधील उपचारांचा खर्च देखील समाविष्ट आहे. इतर इन्शुरन्स प्लॅनप्रमाणे हा प्लॅन केवळ पावसाळ्यापुरती मर्यादित नाही. हे वर्षभर संरक्षण प्रदान करते, त्यामुळे PhonePe यूझर्स कधीही विम्याचा लाभ घेऊ शकतात.

advertisement

हा प्लॅन PhonePe ॲपवर त्वरित खरेदी, व्यवस्थापित आणि क्लेम केला जाऊ शकतो. 100% डिजिटल प्रोसेसमुळे, क्लेम जलद आणि सहजपणे सोडवले जातात. ज्यांच्याकडे आधीच कॉर्पोरेट आरोग्य विमा आहे ते देखील अतिरिक्त संरक्षणासाठी हा प्लॅन निवडू शकतात.

स्टूडेंट्सही तयार करु शकता चांगलाCredit Score? भविष्यात होईल फायदाच फायदा

PhonePe इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे सीईओ विशाल गुप्ता म्हणाले, 'प्रत्येकासाठी विमा सुलभ आणि परवडणारा बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा नवीन प्लॅन यूझर्सना वर्षभर सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करण्याचा आमचा संकल्प दर्शवते. हे लोकांना आरोग्य जोखीम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास आणि आर्थिक समस्या टाळण्यास अनुमती देते.'

advertisement

Credit Card ने कधीच करु नका या चुका! खराब होईल CIBIL Score

ते पुढे म्हणाले, 'आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून देशातील लोकांना त्यांच्या गरजेनुसार विमा उपाय देऊ इच्छितो, जेणेकरून प्रत्येक भारतीयाला मनःशांती मिळेल.'हा विमा PhonePe ॲपवरील 'इन्शुरन्स' विभागात जाऊन 'डेंग्यू आणि मलेरिया' ऑप्शन निवडून खरेदी केला जाऊ शकतो. यूझर्स प्लॅन डिटेल्स, विमा रक्कम आणि प्रीमियम ऑप्शन पाहू शकतात. पॉलिसीधारकाची माहिती भरून आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून काही मिनिटांत विमा मिळू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
PhonePe ने लॉन्च केला डेंग्यू-मलेरियासाठी स्वस्त इन्शुरन्स, किंमत फक्त 59 रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल