TRENDING:

आता Form-16 ला म्हणा बाय बाय! येणार Form 130, पण याचा अर्थ काय? 

Last Updated:

नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून नवीन टॅक्स सिस्टममध्ये Form-16 च्या जागी Form-130 येणार आहे. पण याचा नेमका अर्थ काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

advertisement
Form 130 Income Tax: देशाच्या टॅक्स सिस्टममध्ये 1 एप्रिल 2026 पासून मोठे बदल होणार आहेत. तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्यासाठी हे बदल खुप महत्त्वाचे ठरतील. कारण आता इन्कम टॅक्स नियम 2026 लागू होताच तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून Form 16 नाही तर नवा Form 130 मिळेल. हे करण्यामागे सरकारचा हेतू टॅक्स फायलिंग पूर्णपणे ऑटोमॅटिक आणि ट्रान्सपरेंट करणे हा आहे.
नवे इन्कम टॅक्स नियम
नवे इन्कम टॅक्स नियम
advertisement

Form 130 का गरजेचा आहे?

Form 130 हे एक डिजिटल सर्टिफिकेट असणार आहे. ज्यामध्ये तुमची सॅलरी, कट केलेला टॅक्स म्हणजेच TDS आणि तुम्हाला मिळाणाऱ्या सूट म्हणजेच Deductions ची पूर्ण माहिती असेल. आता तुमचे जे काम हे Form 16 वरुन होत होते. तेच काम आता Form 130 च्या माध्यमातून आणखी बारकायीने केले जाईल. तुमच्या कंपनीने तुमच्या सॅलरीमधून टॅक्स कपात करुन सरकारजवळ किती पैसा जमा केला आहे याचा हा कायदेशीर पुरावा असेल. विशेष म्हणजे, आता ते तुम्हाला कंपन्यांकडून तयार करुन मिळणार नाही. हे फक्त सरकारी TRACES पोर्टलवरुनच डाउनलोड केले जाऊ शकेल.

advertisement

या नव्या फॉर्मचे 3 भाग असतील 

Part A: यामध्ये तुमची आणि तुमच्या कंपनीची बेसिक माहिती असेल.

Part B: या डॉक्यूमेंटमध्ये तुम्हाला वर्षभरात मिळालेली एकूण रक्कम आणि त्यावर कट झालेल्या टॅक्सचा हिशोब असेल.

Part C (Annexures): तिसऱ्या भागाचे दोन भाग आहेत. एक Annexure I नोकरदार वर्गासाठी आणि Annexure II सीनियर सिटीझन्ससाठी. यात सेक्शन 392 आणि 393(1) अंतर्गत टॅक्सची पूर्ण माहिती असेल.

advertisement

युद्धाच्या झळा आता बिअर बॉटलपर्यंत! खिसा रिकामा करण्यासाठी राहा तयार

Form 130 कधीपर्यंत मिळणार? काळजी कोणती घ्यावी? 

कंपन्यांना हा फॉर्म प्रत्येक 15 जूनपर्यंत जारी करावं लागेल. एखाद्याने हाताने तयार केलेला किंवा वेबसाइटच्या माध्यमातून तयार केलेला फॉर्म दिला तर तो मान्य नसेल. फक्त TRACES पोर्टलवरुन डाउनलोड करुन डिजिटल किंवा मॅन्युअल साइनसह दिला जाणे गरजेचे आहे. तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक असेल तर कंपनीला आधी ‘Form 138’ भरुन सुधारणा करावी लागेल. यानंतरच तुम्हाला योग्य फॉर्म मिळू शकेल.

advertisement

IT New Rule: एक एप्रिलपासून सॅलरी स्ट्रक्चर बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम? वाचा नवे नियम

या फॉर्मचा उपयोग कसा होईल?

हा फॉर्म तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अटॅच करण्याची आवश्यकता नसेल. पण आपल्या रेकॉर्डसाठी तो सांभाळून ठेवणे गरजेचे असेल. तुम्ही एक वर्षात दोन नोकऱ्या बदलल्या असतील तर तुम्हाला एकापेक्षा जास्त Form 130 ही मिळू शकतील.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
आता Form-16 ला म्हणा बाय बाय! येणार Form 130, पण याचा अर्थ काय? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल