TRENDING:

परदेशात शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी! ही बँक देतेय विना गॅरंटी 50 लाखांपर्यंत कर्ज

Last Updated:

स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जावर 11.15 टक्के दराने व्याज आकारते. त्याच वेळी, SBI स्कॉलर लोन योजनेअंतर्गत, बँक IIT आणि इतर संस्थांना 8.05 टक्के ते 9.65 टक्के दराने कर्ज देते. SBI ग्लोबल एड-व्हँटेज अंतर्गत शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 7.5 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान 10.15% व्याजदर भरावा लागेल. याशिवाय विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे.

advertisement
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जावर 11.15 टक्के दराने व्याज आकारते. त्याच वेळी, SBI स्कॉलर लोन योजनेअंतर्गत, बँक IIT आणि इतर संस्थांना 8.05 टक्के ते 9.65 टक्के दराने कर्ज देते. SBI ग्लोबल एड-व्हँटेज अंतर्गत शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 7.5 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान 10.15% व्याजदर भरावा लागेल. याशिवाय विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे.
एज्युकेशन लोन
एज्युकेशन लोन
advertisement

तुमचा मुलगा परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असेल तर, स्टेट बँक ऑफ इंडिया, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय 50 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज ऑफर करत आहे. याशिवाय तुम्ही या बँकेकडून 3 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. SBI ग्लोबल एड-व्हँटेजद्वारे परदेशी संस्थांमध्ये अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टडी कर्ज लोन करून देत आहे.

advertisement

Cyber Fraud : बेरोजगार, विद्यार्थी आणि गृहिणींनो सावधान! 'Pig Butchering Scam'साठी तुम्हीच आहात मेन टार्गेट

खरंतर, बहुतेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेऊन उज्ज्वल करिअर करायचे असते. परंतु परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते पैशाचे. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात.

भारतातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला गॅरंटीशिवाय शैक्षणिक कर्ज देत आहे. बँकेच्या या ऑफरमुळे तुम्ही सहज परदेशात शिक्षण घेऊ शकाल. यामुळे पालकांचीही पैशाच्या समस्यांपासून सुटका होते आणि ते मुलांच्या फीबाबत निश्चिंत राहतात.

advertisement

तुम्हाला 3 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते

SBI विद्यार्थ्यांना हमीशिवाय कर्ज देत आहे. या कर्जामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च भागवता येतो. यामध्ये ट्यूशन फी, पुस्तके, कंप्यूटर, हॉस्टल चार्ज आणि अभ्यासाशी संबंधित इतर खर्च समाविष्ट आहेत. तुम्ही विना गॅरंटी स्टडी लोनविषयी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एसबीआय एज्युकेशन लोन कसे मिळवायचे आणि त्यासाठी काय प्रक्रिया आहे असा प्रश्न तुम्हालाही पडत आहे? चला तर मग जाणून घेऊया बँकांकडून हमीशिवाय तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कसे घेऊ शकता.

advertisement

गॅरंटीशिवाय लोन: स्टेट बँक ऑफ इंडिया निवडक संस्थांकडून कोणत्याही गॅरंटीशिवाय 50 लाख रुपयांपर्यंत स्टडी लोन देतात.

परतफेडीचा कालावधी: बँक तुम्हाला शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी आणखी वेळ देते. तुम्ही 15 वर्षांसाठी EMI द्वारे कर्जाची परतफेड करू शकता.

कर्जाची रक्कम: या अंतर्गत तुम्ही 50 लाख ते 3 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

advertisement

वितरण कालावधी: फॉर्म I-20 किंवा व्हिसा प्राप्त करण्यापूर्वी कर्ज मंजूर केले जाईल.

टॅक्स सूट: विद्यार्थ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80 (E) अंतर्गत स्टडी लोनवर सूट मिळते. जे उच्च शिक्षणासाठी मिळवलेल्या शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजावर वजावट प्रदान करते.

या देशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लोन मिळेल: युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान, हाँगकाँग, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडममधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये किंवा संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक कर्ज देते.

स्टडी लोनसाठी बँकेत अर्ज कसा करावा

परदेशात शिकण्यासाठी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बजेट ठरवावे लागेल. तुम्हाला कोणत्या देशातील कोणत्या विद्यापीठात शिक्षण घ्यायचे आहे? शिक्षणासाठी किती खर्च येईल मग शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्ही बँक किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे अर्ज करू शकता. शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थी दोन प्रकारे अर्ज करू शकतात. सर्वप्रथम, तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन देखील कर्जासाठी अर्ज करू शकता. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, बँक तुम्हाला कर्ज मंजूर करेल आणि वितरित करेल.

ही महत्त्वाची कागदपत्रे बँकेत द्यावी लागतील

- ओळख प्रमाणपत्र

- अॅड्रेस प्रूफ

- शैक्षणिक डॉक्यूमेंट्स

- उत्पन्न प्रमाणपत्र

- बँक डिटेल्स

- फोटो

- पॅन कार्ड

- व्हिसा डॉक्यूमेंटेशन

- स्टँडर्ड टेस्ट कोड

- इंग्रजी प्रवीणता चाचणी गुण

- उद्देशाचे विधान (SOP)

- रेझ्युमे/सीव्ही

मराठी बातम्या/मनी/
परदेशात शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी! ही बँक देतेय विना गॅरंटी 50 लाखांपर्यंत कर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल