TRENDING:

SBI च्या स्पेशल FD वर मिळेल भारी फायदा! गुंतवणुकीची संधी फक्त मार्चपर्यंत

Last Updated:

भारतात गुंतवणुकीसाठी एफडी हा मार्ग अनेकांना बेस्ट वाटतो. कारण यामध्ये कोणतीही जोखिम नसते. आज आपण अशाच एसबीआयच्या एका एफडीविषयी जाणून घेऊया.

advertisement
मुंबई : तुम्ही Short Term Investment चा ऑप्शन शोधत असाल. तर SBI ची 444 दिवसांची स्पेशल FD तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अमृत ​​वृष्टी योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेवर सर्वसामान्यांना 7.25% टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% टक्के व्याज दिले जात आहे. तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास, तुमच्याकडे फक्त 31 मार्च 2025 पर्यंतच वेळ आहे. या योजनेत तुम्ही 1,00,000 ते 5,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती रिटर्न मिळेल ते जाणून घ्या.
एसबीआय स्पेशल एफडी
एसबीआय स्पेशल एफडी
advertisement

1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर रिटर्न किती आहे?

1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 9,630 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 1,09,630 रुपये होईल. तर सामान्य नागरिकांना व्याज म्हणून 9,280 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 1,09,280 रुपये होईल.

Ladki Bahin Yojana: सरकारचा लाडक्या बहिणीला दणका, खात्यावरुन काढून घेतले पैसे

advertisement

2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर रिटर्न किती?

2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत व्याज म्हणून 19,574.08 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 2,195,74.08 रुपये होईल. तर सामान्य नागरिकांना व्याज म्हणून 18,267.08 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 2,18,267.08 रुपये होईल.

3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर रिटर्न किती आहे?

3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 29,361.13 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 3,29,361.13 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 27,400.62 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 3,27,400.62 रुपये होईल.

advertisement

फक्त स्टेप-अपच नाही तर SIP चेही आहेत प्रकार, कोण देतं सर्वात जास्त रिटर्न

4,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर रिटर्न किती आहे?

हे 4,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मोजले गेले, तर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत व्याज म्हणून 39,148.17 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 4,39,148.17 रुपये होईल. तर सामान्य नागरिकांना व्याज म्हणून 36,534.15 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 4,36,534.15 रुपये होईल.

advertisement

5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर रिटर्न किती आहे?

5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 7.75% दराने 48935.21 रुपये व्याज मिळेल म्हणजेच मॅच्योरिटीची रक्कम 548935.21 रुपये असेल. तर सामान्य नागरिकांना 7.25% दराने 45,667.69 रुपये व्याज मिळेल आणि परिपक्वता रक्कम 5,45,667.69 रुपये असेल.

मराठी बातम्या/मनी/
SBI च्या स्पेशल FD वर मिळेल भारी फायदा! गुंतवणुकीची संधी फक्त मार्चपर्यंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल