Ladki Bahin Yojana: सरकारचा लाडक्या बहिणीला दणका, खात्यावरुन काढून घेतले पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ladki Bahin Yojana: सरकारने लाडक्या बहिणीची लाभार्थी असलेल्या खात्यावरुन दिलेले पैसे पुन्हा काढून घेतल्याची घटना समोर आली.
मुंबई: लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यात कोट्यवधींनी घेतला आहे. मात्र निवडणुकीनंतर लाडकी बहीणचे निकष कठोर करण्यात आले आहेत. अर्जांची फेरतपासणी सुरू झाली आहे. याबाबत आता हळूहळू निकषांवर चर्चा सुरू झाली आहे. सरकारने लाडक्या बहिणीची लाभार्थी असलेल्या खात्यावरुन दिलेले पैसे पुन्हा काढून घेतल्याची घटना समोर आली.
निकष डावलून अर्ज केल्यानं कारवाई
निकषांना डावलून ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर सरकार कारवाईचा बडगा उचलत आहे. धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यावरुन साडे सात हजार रुपये सरकारने काढून घेतले आहेत. ही योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा काही निकष ठरवून देण्यात आले होते. निवडणूक होईपर्यंत सरकरट रक्कम खात्यावर येत होती. ज्या ज्या भागात तक्रारी आल्या त्या भागातील लाभार्थ्यांचे अर्ज आणि कागदपत्र पुन्हा पडताळली जात आहेत.
advertisement
सरकारने का काढून घेतले पैसे?
मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेच्या खात्यावरुन लाडकी बहीणचे पैसे सरकारने पुन्हा काढून घेतले. या महिलेने पाच हप्त्यांपर्यंत लाभ घेतला होता. या महिलेनं सरकारी योजनेता लाभ घेतला होता, त्यामुळे ती लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसूनही अर्ज भरला आणि पैसे घेतले त्यामुळे या महिलेचा अर्ज बाद करण्यात आला आहे.
advertisement
स्क्रुटिनीवर काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश दिले आहेत. अदिती तटकरे यांनी देखील याबाबत शुक्रवारी सविस्तर माहिती दिली होती. पुण्यात याआधी 10 हजार अर्ज बाद करण्यात आले. अर्जाची पडताळणी सुरू झाली असून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील. लाडक्या बहिणीच्या नावे जे भाऊ पैसे घेत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल असे स्पष्ट संकते मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
advertisement
तक्रारींच्या निमित्ताने केशरी आणि पिवळे रेशनकार्ड वगळता सर्वच अर्जांनी छाननी केली जाणार आहे. तर या दोन्ही रेशनकार्ड असलेल्या लाभार्थ्यांबाबत जर कोणी तक्रार केली तर त्यांचेही अर्ज तपासले जाणार आहेत.
अर्ज बाद होण्याचे निकष
कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
advertisement
घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
शासकीय नोकरी अलकाना घेतलेला योजनांचा लाभ
एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही
ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2025 7:15 AM IST