advertisement

8 दिवस पोलिसांना गुंगारा, रस्त्याच्या कडेला कार लावत डॉक्टरचे स्वत:वर ब्लेडने वार, कारण भयंकर

Last Updated:

एका डॉक्टरने भंडाऱ्याच्या दिशेनं जात असताना आपली कार रस्त्याच्या कडेला लावली आणि कारमध्येच स्वत:वर ब्लेडने हल्ले केला.

News18
News18
सरवर शेख, भंडारा प्रतिनिधी: भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका डॉक्टरने भंडाऱ्याच्या दिशेनं जात असताना आपली कार रस्त्याच्या कडेला लावली आणि कारमध्येच स्वत:वर ब्लेडने हल्ले केला. त्याने पोटावर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ज्या डॉक्टरने स्वत:वर हल्ला केला. त्याच्या मागावर पोलीस होते. तो ८ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर अटकेच्या भीतीने त्याने जीवन संपवण्यचा प्रयत्न केला.
नितेश वाजपेयी असं स्वत:वर हल्ला करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. ८ दिवसांपूर्वी म्हणजेच ६ फेब्रुवारी रोजी त्याच्यासह त्याच्या काही साथीदारांविरोधात भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहा दिवसांच्या बाळाची विक्री केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल होता. भंडारा जिल्हा बाल विकासच्या वतीने ही तक्रार दाखल केली होती.
याच प्रकरणात भंडारा पोलीस मुख्य सूत्रधार आरोपी डॉक्टरच्या मागावर होते, मात्र डॉ नितेश वाजपेयी व त्याचे 3 साथीदार हे पोलिसांच्या हातात लागत नव्हते. आता डॉक्टर नितेश वाजपेयीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेच्या वेळी तो बालाघाट कटनी येथून स्वतःच्या खासगी चारचाकी वाहनाने भंडाऱ्याच्या दिशेने येत होता.
advertisement
यावेळी रस्त्याच्या कडेला कार थांबवून स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या ड्रायव्हरने डॉक्टरला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्यावर तत्काळ उपचार करून, भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरला दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या डॉ. नितेश वाजपेयी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
8 दिवस पोलिसांना गुंगारा, रस्त्याच्या कडेला कार लावत डॉक्टरचे स्वत:वर ब्लेडने वार, कारण भयंकर
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement