डोंबिवलीत पहाटे अग्नितांडव, पार्किंगमधील 29 गाड्या जळून खाक, 5 जण होरपळले
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
डोंबिवली पूर्व परिसरात आज पहाटेच्या सुमारास आग्नितांडव पाहायला मिळाला आहे. सागाव येथील चेडा नगरमधील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत तब्बल २९ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
advertisement
advertisement
नेमकी घटना काय? - डोंबिवली पूर्वेकडील सागाव, चेडा नगर भागात जय भारत स्कूलजवळ रविकिरण सोसायटी (राज अपार्टमेंट) ही इमारत आहे. आज पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास, जेव्हा सर्व रहिवासी गाढ झोपेत होते, तेव्हा इमारतीच्या बेसमेंटमधील मोटरसायकल पार्किंगमध्ये अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांनी पेट घेतला.
advertisement
advertisement
advertisement
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग इमारतीच्या वरील मजल्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवण्यात यश आले. पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. सर्व नागरिक भीतीने इमारतीबाहेर मोकळ्या जागेत जमा झाले होते.
advertisement








