advertisement

Bigg Boss Marathi 6 : उठा, निघा, बंद करा! भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखच्या रागाचा भडका, असं काय घडलं?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Ruchita Jamdar : बिग बॉस मराठी 6 च्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश देशमुख भडकलेला दिसतो आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमध्ये आज पाचवा भाऊचा धक्का आहे. भाऊचा धक्का म्हणजे मजा-मस्ती आणि सोबतच कानउघडणीही असते. आठवड्याभरात सदस्यांनी काय काय केलं, त्याचा पाढा ऐकवला जातो. चांगल्या गोष्टीचं कौतुक आणि वाईटासाठी चांगलंच सुनावलं जातं. रितेशदादा आजवर अनेकांची शाळा घेताना दिसला आहे, पण यावेळी तो खूपच भडकला आहे. त्याच्या रागाचा भडका उडाला आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश देशमुख भडकलेला दिसतो आहे. याचं कारण आहे ते रुचिता जामदार. रुचिता जामदार एका एपिसोडमध्ये थुंकताना दिसली. म्हणजे दिपाली सैय्यदसमोर तिने आ थू असं केलं आणि याच गोष्टीवरून रितेश भाऊच्या धक्क्यावर तिला चांगलंच झापताना दिसतो आहे.
advertisement
रुचिता तुम्ही दिपाली यांच्यासमोर आ थू असं केलं. यावेळी रुचिता मधेच बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा रितेश तिला मी बोलतो आहे ना, असं बोलून तिला रोखतो. पुढे तो म्हणतो, तुम्ही जे केलं आहे ते महाराष्ट्रातल्या कोणत्याच आईला आवडलं नाही आहे. यावेळी रुचिता तोंड वाकडं करते. रुचिताचं ते वागणं पाहून रितेशच्या रागाचा भडकाच उडतो. तो तिला म्हणतो हे असे एक्स्प्रेशन द्यायचे असतील तर आत जा, भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. उठा आणि निघा. प्रोमोच्या शेवटी तो बंद करा असं म्हणताना दिसतो.
advertisement
advertisement
त्यामुळे रुचिताचं वागण आता तिला भोवणार का? यावेळी रुचिताचा बिग बॉसच्या घरातून पत्ता कट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : उठा, निघा, बंद करा! भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखच्या रागाचा भडका, असं काय घडलं?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement