Samruddhi Mahamarg: ज्या समृद्धी महामार्गावर काम करायच्या, तिथेच मृत्यूने गाठलं, मृतांचा आकडा 8 वर
- Published by:Sachin S
Last Updated:
समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची शिवारात दुपारच्या सुमारासह ही घटना घडली. समृद्धी महामार्गावर महिला मजुरांनी घेऊन एक पिकअप व्हॅन चालली होती
रवी जयस्वाल, प्रतिनिधी
जालना : महाराष्ट्राची ह्रदयरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली, जालन्यात समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकने पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा आता ८ वर पोहोचला आहे. दोन महिला मजुरांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. आणखी जखमी महिलांवर उपचार सुरू आहे.
advertisement
ोो. त्यावेळी एका भरधाव ट्रकने पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता. तर काही जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. यामध्ये ७ ते ८ महिला जखमी झाल्या होत्या. उपचारादम्यान उशिरा रात्री आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली.
advertisement
काय घडलं नेमकं?
समृद्धी महामार्गावर या महिला काम करत होत्या. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पिकअप व्हॅन होती. या पिकअप व्हॅनमधून सगळ्या महिला जात होत्या. त्याचवेळी नागपूरवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या एका ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर काही महिला या बाहेर फेकल्या गेल्या आणि ट्रकखाली सापडल्या. भरधाव ट्रकने या महिलांना चिरडलं. समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेल्या मजूर महिलांच्या मृतदेह पडलेले होते. हे दृश्य पाहून उपस्थितीत हादरले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी तालुका जालना पोलीस दाखल झाले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी देखील मदत केली. जखमी महिला मजुरांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 10:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Samruddhi Mahamarg: ज्या समृद्धी महामार्गावर काम करायच्या, तिथेच मृत्यूने गाठलं, मृतांचा आकडा 8 वर










