फक्त Bigg Boss मध्येच दिसते! तरी मुंबई-दुबईत कोट्यवधीचं घरं; राखी सावंत वर्षभर असं करते काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : राखी सावंत जिची ना कोणती नवीन फिल्म, ना सीरिअल, ना आयटम साँग, ही फक्त बिग बॉसमध्येच दिसते, तरी ती लक्झरी लाइफ जगत असल्याचं तिने स्वत:च सांगितलं होतं. हे कसं शक्य आहे?
बिग बॉस आणि राखी सावंत म्हणजे एक समीकरणच म्हणावं लागेल. हिंदी आणि मराठी दोन्ही बिग बॉसमध्ये राखी सावंत दिसली आहे. मग ते सुरुवातीपासून असो वा वाइल्ड कार्ड एंट्री. बहुतेक बिग बॉसमध्ये राखी सावंत वाइल्ड कार्ड एंट्रीने आली आहे. आताही बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेत तिने धुमाकूळ घातला आहे.
advertisement
पण तुम्ही पाहिलं असेल बिग बॉस सुरू झालं की राखीच्या नावाची चर्चा सुरू होते, राखी तेव्हाच दिसू लागते. ना कोणती सीरिअल, ना कोणती फिल्म, ना कोणतं गाणं... फक्त बिग बॉस... तरी राखी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. हे कसं काय? बिग बॉस नसतं तेव्हा राखी काय करते, ती इतके पैसे कसे कमवते, तिच्या कमाईचा मार्ग काय?
advertisement
राखीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 10 वर्षांची असताना तिनं कॅटेरिंगमध्ये वाढपी म्हणून काम केलं. या कामाचे तिला 50 रुपये मिळायचे. 11 वर्षांची असताना राखीनं एका दांडीया इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. ज्यामुळे तिच्या आईनं तिला खूप मारलं होतं. पण राखीला या इंडस्ट्रीबद्दल खूप आकर्षण होतं. तिनं आई-वडिलांच्या विरोधात जाऊन हिरोईन होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
advertisement
त्यानंतर मात्र या चित्रपटानंतर तिला अभिनय क्षेत्रात जम बसवता आला नाही. यानंतर तिने डान्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. राखीने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग केलं. एक काळ असा होता जेव्हा राखीला बी-टाऊनची टॉप आयटम गर्ल म्हटलं जायचं. 2003 साली राखीचं मोहब्बत है मिर्ची हे गाणं तुफान हिट झालं.
advertisement
advertisement
राखीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बुर्ज खलिफामध्ये माझे 4-5 फ्लॅट आहेत. अनेक व्हिला आहेत, मी नाश्त्यात बकलावा-हकलावा खाते. खजूर, तूप अशा सर्व गोष्टींनी मी अंघोळ करते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी विणलेल्या साड्या मी निसते, माझ्याकडे 200 बॉडीगार्ड आहेत. मला घरात बाथरुमला जरी जायचं असेल तरी मी सायकलचा वापर करते. माझं घर खूप मोठं आहे"
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार राखी सावंतकडे 37 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिचे मुंबई आणि दुबईमध्ये आलिशान घरं असून तिच्याकडे अनेक आलिशान गाड्यांही आहेत. राखीचं मुंबईतील अंधेरी येथे स्वत:चं घरं आहे. जुहूमध्ये 2 बंगल्यांची ती मालकीण आहे. चित्रपटांव्यतिरिक्त राखी सावंत रिअॅलिटी शो, जाहिरात शूट, ब्रँड प्रमोशन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवते.






