Jalna Crime : मुलगी मृत्यूशी झुंज देतेय, मदतीसाठी हात पसरले अन् भाजीविक्रेत्याचा केला घात, जालन्यात 8 लाखाला लुटलं
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालन्यातून भाजीविक्रेत्याचा फसवणुकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. भाजी खरेदी करून ओळख वाढवल्यानंतर मुलगी आजारी असल्याचे कारण सांगून सोन्याचा खोटा हार देऊन तब्बल 8 लाख रुपये उकळण्यात आले.
जालना : जालन्यातून भाजीविक्रेत्याचा फसवणुकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. भाजी खरेदी करून ओळख वाढवल्यानंतर मुलगी आजारी असल्याचे कारण सांगून सोन्याचा खोटा हार देऊन तब्बल 8 लाख रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी संतोष नामदेव उमरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध सदर बाजार पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष उमरे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याशी दोन-तीन वेळा भाजी खरेदी करून ओळख वाढवली. नंतर आमची मुलगी खूप आजारी आहे. तिला पैशांची गरज आहे असे सांगून सोन्याचा हार देऊन 2 लाख रुपये घेतले.
advertisement
यानंतर पुन्हा एकदा, मुलीची तब्येत गंभीर आहे असे सांगितले. आणि 6 लाख रुपयांची गरज आहे असे सांगून 6 लाख रुपये घेतले. संबंधित भाजीविक्रेत्याने मुलीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला असता नंबर बंद येत असल्याने संशय बळावला. म्हणून संतोष उमरे यांनी सोनाराकडे जाऊन हार तपासला असता तो सोन्याचा नसून धातूचा असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञात दोन आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 9:08 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Jalna Crime : मुलगी मृत्यूशी झुंज देतेय, मदतीसाठी हात पसरले अन् भाजीविक्रेत्याचा केला घात, जालन्यात 8 लाखाला लुटलं







