Weather Alert In Marathi : पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीत उष्णतेचा पारा वाढला, IMD चा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
पुढील दोन दिवस मुंबईमधील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, यावरून 15 फेब्रुवारी ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवलीमधील हवामान अंदाज कसा असेल बघुयात.
महाराष्ट्रात हळुहळु थंडी ही ओसरायला लागली आहे. त्यातूनही आता उकाडा जाणवू लागला. त्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. पहाटे काही प्रमाणात थंडी अजूनही अनेक भागात जाणवते परंतु हे सोडता दुपारनंतर हा उकाडा अगदीच एप्रिल-मे महिन्यातला उकाड्यासारखा अनुभवायला मिळतो. पुढील दोन दिवस मुंबईमधील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, यावरून 15 फेब्रुवारी ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवलीमधील हवामान अंदाज कसा असेल बघुयात.
advertisement
advertisement
कल्याण-डोंबिवलीत हवामान कोरडे, स्वच्छ आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. शनिवार प्रमाणे किमान आणि कमाल तापमान स्थिर असून,कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन असल्याने उष्णता जाणवेल. हवामान बदलामुळे पुढील काही दिवस आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान कोरडे आणि उष्ण असेल. शनिवार पेक्षा तापमानात वाढ झाल्याने किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान घट होऊन 38 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री हलकी थंडी जाणवू शकते, तर दुपारी उष्णतेत वाढ होऊन उन्हाचा कडाका अधिक असेल. नागरिकांनी कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी.