Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा संकट! 48 तास महत्त्वाचे, कोकण ते विदर्भ अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert in Marathi: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून फेब्रुवारीच्या मध्यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
फेब्रुवारीच्या मध्यातच महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. सकाळी गारवा असला तरी दुपारपर्यंत तापमान झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत तापमानात सातत्याने वाढ होत असून हिवाळा संपत आल्याचे चित्र आहे. 14 फेब्रुवारी रोजीही राज्यात उष्णतेचा प्रभाव कायम आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीतील काही भागांत वाढत्या तापमानामुळे परिस्थिती अधिक तीव्र झाली आहे.
advertisement
कोकण किनारपट्टीत विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत सलग दोन दिवस तापमानात वाढ नोंदवली गेली आहे. दुपारच्या वेळेत उष्णता आणि आर्द्रता दोन्ही वाढल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. किनारपट्टी भागात दमट वाऱ्यांमुळे अस्वस्थता वाढली असून नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील. सकाळी हलका गारवा जाणवेल, मात्र पुढे तापमानात हळूहळू वाढ होऊन दुपारपर्यंत उष्णतेची जाणीव स्पष्ट होईल. कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 16 ते 19 अंशांदरम्यान नोंदवले जाईल. रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी होईल.
advertisement
विदर्भ आणि मराठवाडा या विभागांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे आणि काही जिल्ह्यात तापमानात वाढ राहील. विदर्भात कमाल तापमान साधारण 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल. मराठवाड्यातही कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल आणि किमान तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. त्यामुळे दुपारच्या वेळेत उष्णतेचा अनुभव अधिक जाणवेल, तर सकाळ-रात्री हलका गारवा जाणवेल.







