Ladki Bahin Yojana: कुणाला पैसे मिळणार कुणाला नाही? निकष काय, कुणाला वगळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं

Last Updated:

Ladki Bahin Yojana Latest News: अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली, ज्यांच्या तक्रारी आल्या, ज्या लाभार्थी आयकर भरत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana: कुणाला पैसे मिळणार कुणाला नाही? निकष काय, कुणाला वगळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं
Ladki Bahin Yojana: कुणाला पैसे मिळणार कुणाला नाही? निकष काय, कुणाला वगळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं
मुंबई: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. ज्या महिलांच्या आधार कार्डवरील नावात आणि बँक खात्याच्या नावात तफावत आढळून आली त्यांचेही अर्ज बाद होणार आहेत. शिवाय अर्ज आणि कागदपत्रांची स्क्रीटीनी होणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली, ज्यांच्या तक्रारी आल्या, ज्या लाभार्थी आयकर भरत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांचं उत्पन्न आता अडीच लाखहून अधिक वाढलेलं असेल त्यांचे अर्ज बाद केले जातील असंही त्यांनी सांगितलं. त्या काय म्हणाल्या त्यांच्या बोलण्यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते होते जाणून घेऊया.
advertisement

कधी येणार खात्यावर पैसे?

आतापर्यंत सहा हप्ते खात्यावर जमा करण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. अजून 64 लाख अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यातील सुरू आहे. त्यापैकी 10 हजार अर्ज बाद झाले आहेत जे निकषांमध्ये बसत नाहीत. नवीन अर्ज करण्याबाबत सध्या कोणताही निर्णय नाही. शिवाय वयाच्या अटीच्या नियमात तूर्तास बदल करण्यात येणार नाही. मकरसंक्रांतीपर्यंत सातवा हप्ता येण्याची शक्यता आहे अशी चर्चा देखील आहे.
advertisement

काय म्हणाल्या आदिती तटकरे

  • लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे
  • अडीच लाखहून अधिक उत्पन्न असलेल्यांच्या ज्या ज्या तक्रारी आल्या त्याचे फेरतपासणी होणार
  • निवडणुकीनंतर लाडकी बहीण लाभार्थ्या
  • निकष आहेत त्या निश्चित केल्यात त्यालाच कायम ठेवून आम्ही फेरतपासणीची कार्यपद्धत निवडली आहे
  • इनकम टॅक्स आहे, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार, इनकम टॅक्स डेटा रिक्नसाइल
  • करणं हा विषय घेतला आहे. स्वत: हून तक्रारी आल्यात, त्यांचे अर्ज बाद झाले आहेत, आयकरच्या डेटाची मदत घेऊन रिकन्झाइल करणार
advertisement

या महिला ठरणार अपात्र

  • सरसकट स्क्रुटिनी होणार नाही
  • उत्पन्नात वाढ झाली असेल ती लाभार्थी म्हणून पात्र नाही
  • दुचाकीच्या वर चारचाकी असेल तर पात्र नाही
  • आधार आणि बँक नावात तफावत असेल तर ते पात्र नाहीत
  • ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.
  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाहीये.
  • ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana: कुणाला पैसे मिळणार कुणाला नाही? निकष काय, कुणाला वगळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement