सोलापूर: शून्यातून जग निर्माण करणऱ्या हरहुन्नरी व्यक्तींची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली आहेत. सोलापुरातील अशाच एका 20 वर्षीय तरुणाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आदित्यनगर येथे राहणाऱ्या रोहन विद्याकुमार शेलार या तरुणाने केक शॉपमध्ये काम करत स्वतः केक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आता तो वर्षाला लाखोंची उलाढाल करत आहे.
सोलापुरात राहणाऱ्या रोहनच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे तो एका केकच्या दुकानात कामाला लागला. तेथे रोहनने संपूर्ण काम शिकून घेतलं. 30 हजार रुपयांची गुंतवणूक करून स्वतःचा सिटी केक या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. या बेकरीचं संपूर्णपणे मार्केटिंग सोशल मीडियावर रोहनने केला. 4 वर्षांपूर्वी त्यानं सुरू केलेल्या व्यवसायाला अल्पावधित प्रसिद्धी मिळाली.
advertisement
अंगी जिद्द अन् चिकाटी, लातूरचा तरुण सोलापुरात बनला आरोग्यसेवक, प्रेरणा देणारी कहाणी, VIDEO
लाखोंची कमाई
रोहन यांच्या सिटी केक दुकानात 8 जण काम करत आहे. 250 ग्रॅम ते 110 किलो पर्यंतचे केक या ठिकाणी बनवून दिले जातात. तसेच ग्राहकांना ज्या प्रकारे डिझाईन पाहिजे त्या प्रकारचे केक या ठिकाणी बनवून दिले जाते. 250 रुपयांपासून ते 35 हजार रूपये पर्यंतचे केक या ठिकाणी मिळतात. आईस केक, पायनापल केक, स्ट्रॉबेरी केक, चॉकलेट केक आदी केक या ठिकाणी मिळतात. या केक विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई होते. तर वर्षा अखेर पर्यंत 3 ते 5 लाख रुपयांची कमाई 20 वर्षीय रोहन करतो.