TRENDING:

घर घ्यायचा विचार करताय? SBI कडून होम लोनच्या व्याजदरात कपात

Last Updated:

घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं; पण आजकाल घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं तेवढं सोपं नाही. अशातच एखाद्या बॅंकेने होम लोनचा इंटरेस्ट रेट कमी केला तर ग्राहकांना त्यासारखा दुसरा दिलासा नाही.

advertisement
नवी दिल्ली : घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं; पण आजकाल घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं तेवढं सोपं नाही. अशातच एखाद्या बॅंकेने होम लोनचा इंटरेस्ट रेट कमी केला तर ग्राहकांना त्यासारखा दुसरा दिलासा नाही. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नुकताच असा दिलासा ग्राहकांना दिला आहे.
SBI कडून होम लोनच्या व्याजदरात कपात
SBI कडून होम लोनच्या व्याजदरात कपात
advertisement

ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच ‘एसबीआय’ने होम लोनवरचा व्याजदर कमी केला आहे. तुम्हीही अत्यंत सहजपणे या संधीचा लाभ घेऊन घर खरेदी करू शकता. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर अवघ्या 8.40 टक्के व्याजदराने एसबीआय तुम्हाला होम लोन देते. त्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तर तुम्हाला लगेच लोन मिळू शकतं. तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तरी तुम्हाला लोन मिळेल; मात्र एसबीआय तुमच्याकडून अधिक व्याजदर आकारेल. सिबिल स्कोअर खूप वाईट असेल, तर मात्र तुम्हाला एसबीआयकडून लोन मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्या होम लोन घेणाऱ्या ग्राहकांकडून एसबीआय प्रोसेसिंग फी घेत नसल्यामुळे ग्राहकांना हे लोन घेणं जास्तच सोयीचं ठरेल.

advertisement

तुमची बायको होऊ शकते करोडपती, LIC ची योजना तुम्हाला माहिती नसेल, फक्त करायचं एकच काम!

तुम्हाला एसबीआयचं होम लोन हवं असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबुक, मोबाइल नंबर, रेशन कार्ड ही कागदपत्र बॅंकेला देणं आवश्यक आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर मागची तीन वर्षं आयटी रिटर्न भरल्याचे पुरावे, तीन वर्षांची बॅलन्स शीट, प्रॉफिट ॲंड लॉस अकाउंट स्टेटमेंट, बिझनेस लायसन्स, टीडीएस सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रं बॅंकेला द्यावी लागतात. एसबीआयकडून वर्षभर विविध होम लोन स्कीम आणल्या जातात. त्याशिवाय विविध प्रमोशनल ऑफरही असतात. व्याजाचे दर कमी असतील तर ग्राहकांवरच्या कर्जाचा बोजा कमी असतो. ग्राहक ही संधी साधतात आणि घर खरेदीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात. ग्राहकांची गरज आणि त्यांची आर्थिक स्थिती यावर एसबीआय कर्ज देण्याचा निर्णय घेते. तुम्ही घर खरेदीचा विचार करत असाल तर जवळच्या एसबीआय बॅंक शाखेशी संपर्क साधा आणि अधिक माहिती घेऊन अर्ज करा.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
घर घ्यायचा विचार करताय? SBI कडून होम लोनच्या व्याजदरात कपात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल