TRENDING:

रेल्वे तिकीट दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करता येतं का? काय आहे नियम

Last Updated:

आपल्या तिकिटावर इतर कोणी प्रवास करू शकेल का, असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडतो.

advertisement
मुंबई : भारतात दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. ही एक अशी वाहतूक व्यवस्था आहे, जिचा गरीबातील गरिब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती वापर करते. त्यामुळे भारतीय रेल्वेची गणना जगातील मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी अनेक नियम केले जातात. पण, असे काही नियम देखील आहेत ज्यामुळे प्रवाशांची अनेकदा कोंडी होते. रेल्वेच्या तिकीटाबाबतही अनेक नियम आहेत. आपल्या तिकिटावर इतर कोणी प्रवास करू शकेल का, असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

रेल्वे वेळोवेळी प्रवाशांना स्वतःचं ट्रेन तिकीट खरेदी करण्याच्या सूचना देत असते. तरीही, अनेक लोक एजंटकडून तिकिटं खरेदी करतात. एजंटकडून तिकिटं घेतल्यास जास्त पैसे मोजावे लागतात.

आपलं रेल्वे तिकीट इतरांना देता येतं का?

जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला प्रवास करणं शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं तिकीट रद्द करू शकता. तुम्ही तुमचं तिकीट इतरांनाही देऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटींचं पालन करावं लागेल. तुम्ही स्वत:च्या कौंटुबिक नात्यातील कोणालाही तुमच्याकडील तिकीट ट्रान्सफर करू शकता. या नात्यांमध्ये आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पत्नी किंवा पती यांचा समावेश होतो.

advertisement

ही तिकीट ट्रान्सफरची प्रक्रिया फक्त एकदाच करता येते. म्हणजेच तुम्ही तुमचं तिकीट एकदाच ट्रान्सफर करू शकता. प्रवाश्याचं नाव तिकीटातून काढून टाकलं जातं आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर केलं गेले आहे त्याचं नाव टाकलं जातं.

24 तास अगोदर तिकीट ट्रान्सफर केलं जाऊ शकतं

तुम्हाला प्रवास करायचा नसेल आणि तुम्हाला तुमचं तिकीट एखाद्याला ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला प्रवासाच्या 24 तास आधी रेल्वेकडे अर्ज करावा लागेल. यानंतर अर्जामध्ये ज्या व्यक्तीचं नाव दिलं आहे त्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर केलं जाईल. लग्नाला जाणाऱ्या प्रवाश्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यास, लग्न आणि पार्टीच्या आयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह 48 तास अगोदर अर्ज करावा लागेल. ही सुविधा तुम्ही ऑनलाईनही मिळवू शकता.

advertisement

ट्रेन तिकीट ट्रान्सफर कसं करावं?

1) टिकटाची प्रिंट आउट काढा.

2) तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनमधील रिझर्वेशन काउंटरवर जा.

3) ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट हस्तांतरित करायचं आहे, त्यांचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सोबत ठेवावं लागेल.

4) काउंटरवर तिकीट ट्रान्सफरसाठी अर्ज करा.

मराठी बातम्या/मनी/
रेल्वे तिकीट दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करता येतं का? काय आहे नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल