TRENDING:

ईस्ट ऑर वेस्ट डोंबिवलीत काय आहे बेस्ट?

Last Updated:

मुंबईत घर घेणं ज्यांना शक्य होत नाही त्यांची डोंबिवलला मोठी पसंती असते.डोंबिवलीतल्या कोणत्या भागात घराचे दर जास्त आहेत?

advertisement
डोंबिवली, 14 ऑगस्ट : नोकरदार मंडळींचं शहर अशी डोंबिवलीची ओळख आहे. अनेकजण या शहरात फक्त रात्रीच्या विसाव्यासाठी येतात. मुंबईत किंवा उपनगरात आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराच्या वाढत्या किंमतीमुळे मुंबईत घर घेणं ज्यांना शक्य होत नाही त्यांची डोंबिवलला मोठी पसंती असते. डोंबिवलीत घर घेताना पूर्व भागात घेण्याची अनेकांची पसंती असते. मुंबईतील अनेक उपनगरात पश्चिमेपेक्षा पूर्वेला जास्त पसंती असते, पण डोंबिवली शहर याला अपवाद आहे, याचं नेमकं कारण काय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement

डोंबिवलीचे बांधकाम व्यावसायिक सचिन चिटणीस यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार,  डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड फडके रोड या महत्त्वाच्या भागातील जागेचे दर जास्त आहेत. या भागात  पश्चिमेच्या तुलनेत प्रती चौरस फुट एक ते दीड हजार रुपये जास्त दर आहेत.

फक्त 35 रुपयांमध्ये करा साडी खरेदी, ठाण्यात कुठे आहे हे मार्केट?

advertisement

डोंबिवलीच्या सांस्कृतिक घडामोडींचं फडके रोड हे केंद्र आहे. गुढी पाडव्याला निघाणारी शोभायात्रा, डोंबिवलीचं जुनं गणेश मंदिर हे देखील फडके रोडला आहे. त्यामुळे या भागात दर जास्त आहेत, असं चिटणीस यांनी सांगितलं

शॉपिंगची अद्यावत दुकानं, खाणाऱ्यांचाी आवड जपणारी हॉटेल् डोंबिवली पूर्वेला आहेत. या भागात डोंबिवलीकरांची नेहमी गर्दी असते. डोंबिवली पूर्वमधील मधूबन गल्ली महिलांच्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ठाणे आणि नवी मुंबई, कल्याण, ठाणे या शहरांना जाण्यासाठी देखील डोंबिवली पूर्व अधिक सोयीचे आहे, त्यामुळे या भागात जागांचे दर हे जास्त असल्याचं चिटणीस यांनी सांगितलं.

advertisement

भविष्यात परिस्थिती बदलणार?

डोंबिवलीहून ठाण्याला जोडणारा माणकोली पूल हा पश्चिमेकडं होत आहे. हा पूल झाल्यानंतर डोंबिवली पश्चिमेतील जागांचे दरही वाढतील. हे दर पूर्वेच्या जवळपास होतील, अशी आशा बांधकाम व्यवसायिक सचिन चिटणीस यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या/मनी/
ईस्ट ऑर वेस्ट डोंबिवलीत काय आहे बेस्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल