फक्त 35 रुपयांमध्ये करा साडी खरेदी, ठाण्यात कुठे आहे हे मार्केट? PHOTOS

Last Updated:
भारतीय महिलांचा साडी हा प्रमुख पोषाख आहे. त्यामुळे महिला वर्ग विविध प्रकारच्या साड्या आवर्जून खरेदी करत असतात.
1/7
भारतीय महिलांचा साडी हा प्रमुख पोषाख आहे. त्यामुळे महिला वर्ग विविध प्रकारच्या साड्या आवर्जून खरेदी करत असतात. पण कुणी आपल्याला सांगितलं की फक्त 35 रुपयांत नवीकोरी साडी मिळते. तर आपला विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे.

advertisement
2/7
जगप्रसिद्ध असणाऱ्या उल्हासनगर मार्केटमध्ये हे घडतंय. येथील होलेसेल मार्केटमध्ये फक्त 35 रुपयांपासून साड्या उपलब्ध असल्याने दुकानदार, महिला वर्गाची मोठी गर्दी असते.

3/7
साड्यांचे दर हे क्वालिटीवर ठरत असतात. उल्हासनगर मार्केटमध्ये 35 रुपयात मिळणाऱ्या साड्या आहेत. पण या अत्यंत साध्या आहेत. येथे खरेदी करण्यासाठी येणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रातून येतो. घरात सातत्याने साड्या वापराव्या लागतात.

4/7
त्यावेळी महिला साध्या साड्यांना पसंती देतात. इतकेच नव्हे तर गरीब घरातील महिलांनाही साड्या घेता याव्या यासाठी 35 रुपयांपासून साड्या विक्रीसाठी ठेवल्याचे शगुन टेक्सटाइल या दुकानाचे मॅनेजर संतोष पाटील यांनी सांगितले.

5/7
उल्हासनगरमधील दुकानात होलसेल दरात साड्यांसाठी खास ऑफर आहेत. अगदी 35 रुपयांपासून ते 10 हजारापर्यंत साड्या या दुकानात उपलब्ध आहेत. साड्या विकताना प्रत्येक साडी मागे 10 ते 50 टक्के सूट अशी ऑफर चालू आहे. ही ऑफर केवळ मान्सूनपुरती मर्यादित असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

6/7
होलसेल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. यात कांजीवरम, पैठणी, पेशवाई, सेमी पैठणी, ऑर्गेंझा, गार्डन, काठ पदर, बरणी सिल्क, शालू अशा विविध प्रकारातील साड्या आहेत. या साड्यांचे दर साडीचा प्रकार आणि गुणवत्ता यावरून ठरतात. ग्राहकांची पसंती या विविध प्रकारच्या साड्यांना असते, असे दुकानदार सांगतात.

7/7
विशेष म्हणजे शगुन टेक्सटाइल मधील साड्या सुरत येथून येतात. बाकी सर्व साड्या येवला, मध्यप्रदेश, कर्नाटक येथून मागवत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या साड्यांचे रंग, पोत आणि कमी किंमत पाहून महिला वर्ग येथे गर्दी करताना दिसून येत आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement