advertisement

Mumbai Crime : पार्ट टाईम जॉब शोधताय? मुंबईतल्या गृहीणीसोबत भयंकर घडलं, कुटूंब हादरलं

Last Updated:

Mumbai Shocking Crime : आपल्यापैंकी अनेकजण गृहीणी पार्ट टाईम जॉबच्या शोधात असतात. मात्र त्यापूर्वी ही बातमी वाचा अन्यथा मोठ्या अडचणीत सापडू शकता.

News18
News18
मुंबई  :  पार्ट टाईम नोकरीच्या शोधात असलेल्या मुंबईतील एका गृहिणीला ऑनलाइन आमिषाचा फटका बसला. जादा कमाईच्या नावाखाली लाखोंची फसवणूक झाल्याने कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
जॉबच्या शोधात होती, पण गमावून बसली सर्वच
मिरा रोडच्या पूनम गार्डन भागात राहणाऱ्या नितु परूळेकर (वय 45) यांच्याशी अनुष्का रेड्डी नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने घरातून पार्ट टाईम काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल असे सांगत टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर टेलिग्रामवर श्रीया मल्होत्रा आणि अंकित शर्मा या व्यक्तींनी संपर्क साधत एका कथित क्रिप्टो गुंतवणूक अ‍ॅपमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.
advertisement
जादा परताव्याचं खोटं स्वप्न दाखवलं
गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा नफा मिळेल असे आकर्षक आमिष दाखवण्यात आले. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून महिलेनं वेळोवेळी विविध टप्प्यांत एकूण 6,93,515 रुपये गुंतवले. मात्र नफा मिळणे दूरच राहिले उलट गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव परूळेकर यांना झाली.
यानंतर त्यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : पार्ट टाईम जॉब शोधताय? मुंबईतल्या गृहीणीसोबत भयंकर घडलं, कुटूंब हादरलं
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement