advertisement

Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट

Last Updated:

Pune Land Scam : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Rapid Read
Translate
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारला क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारला क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
मुंबई: पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दाखल ल केलेल्या आरोपपत्रानंतर, आता राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना 'क्लीन चिट' मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या १०० पानांच्या अहवालात पार्थ पवार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नसल्याची धक्कादायक पण महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

खारगे समितीचा अहवाल तयार

मुंढवा येथील जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला तपास पूर्ण केला आहे. पुढील आठवड्यात हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात व्यवहारातील तांत्रिक त्रुटी आणि दोषींवर बोट ठेवण्यात आले आहे.
advertisement

पार्थ पवारांना दिलासा का मिळाला?

चौकशी समितीसमोर सादर झालेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये कुठेही पार्थ पवार यांची सही आढळलेली नाही. जमीन खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे न मिळाल्याने त्यांना या प्रकरणात दोषमुक्त मानले जात आहे.

भागीदार गोत्यात, २१ कोटींच्या वसुलीची शिफारस

पार्थ पवारांना दिलासा मिळाला असला, तरी अमेडिया कंपनीच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. अमेडिया कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील यांची कागदपत्रांवर सही असल्याने त्यांना या घोटाळ्यात थेट दोषी ठरवण्यात आले आहे. कंपनीला जमीन विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी यांनाही या प्रकरणात दोषी धरण्यात आले आहे.
advertisement
अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) माफी मिळवली होती. मात्र, आता ही माफी अवैध ठरवून कंपनीकडून २१ कोटी रुपये वसूल करावेत, अशी कडक शिफारस समितीने केली आहे.
एलएलपी कायद्याचा फास
अमेडिया कंपनी ही 'एलएलपी' (LLP) कायद्यांतर्गत नोंदणीकृत असल्याने, स्वाक्षरी नसली तरी कंपनीचे अन्य सक्रिय भागीदार तांत्रिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू असतानाच, या क्लीन चिटमुळे पवार समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कंपनीवर झालेली २१ कोटींच्या वसुलीची शिफारस आणि इतर संचालकांवरील कारवाईमुळे आगामी काळात हे प्रकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement