TRENDING:

फडणवीसांचा ड्रीम प्रोजक्ट, असा उभारला 'कोस्टल रोड'; मुंबईकरांना आणखी एक स्पेशल गिफ्ट!

Last Updated:

कोस्टल रोड आणि सी लिंकच्या जोडणी आता पूर्ण झाली आहे, यामुळे वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा 15 किमीचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल झोरी, प्रतिनिधी
(देवेंद्र फडणवीस)
(देवेंद्र फडणवीस)
advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जात होतं. आधी त्यांनी अटल सेतूचं काम मागच्या मुख्यमंत्रिपदाच्या टर्ममध्ये हाती घेतलं होतं. ते यशस्वी केलं. त्यांचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट निकाली काढण्यासाठीच्या हलचाली त्यांनी सुरू केल्या होत्या. एकीकडे फडणवीस निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. दुसऱ्या बाजूला कोस्टल रोडचे काम प्रगती पथावर आहे. मुंबईच्या इतिहासातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण मुंबईकरांसाठी वरदान ठरणारा कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या क्रमात कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक यशस्वी रित्या जोडण्यात आला आहे. शुक्रवारी बो आर्क स्ट्रिंग गर्डरद्वारे ही मोहिम फत्ते करण्यात आली. त्यामुळे कोस्टल रोडवरची वाहतून थेट सी लिंकवर नेता येईल. मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका करण्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल आहे. गर्डर जोडण्यासाठी समुद्रातील उंच आणि कमी भरतीचा वापर करण्यात आला. अत्यंत नियोजनपूर्ण पद्धतीने हे काम करणारण्यात आलं. गर्डरद्वारे हे दोन्ही मार्ग जोडण्याचा भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग झाला आहे.

advertisement

87 टक्के काम पूर्ण

हवामान अनुकूल होण्याची वाट पाहण्यात आली. यानंतर अभियंत्यांनी समुद्राच्या लाटा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेतला. त्यांनी योग्य नियोजन केलं, आपलं कसब दाखवत प्लॅटफॉर्म जोडला. कोस्टल रोड आणि सी लिंकच्या जोडणी आता पूर्ण झाली आहे, यामुळे वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा 15 किमीचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करता येईल. कोस्टल रोडचे 87% पेक्षा जास्त काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मरिन ड्राईव्ह ते सी लिंकपर्यंतच्या किनारपट्टीचे काम जूनमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. कोस्टल रोड बांधकामाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, "10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी-लिंक ब्रिजला जोडणे. त्यासाठी प्रशासनाने अत्यंत सुनियोजित आराखडा तयार केला आहे."

advertisement

2 हजार मेट्रिक टन वजन

वांद्रे-मरीन ड्रेनच्या दोन टोकांना जोडणारा पहिला गर्डर 25 एप्रिल 2024 ला पहाटे 4 वाजता माझगाव डॉक येथून कोस्टल रोड साइटवर पोहोचला. कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या गर्डरवर आता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. गर्डरला गंजण्यापासून वाचवण्यासाठी सी- 5 या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोस्टल रोड-सी लिंकला जोडणारा गर्डर 2 हजार मेट्रिक टन वजनाचा, 136 मीटर लांब आणि 18 ते 21 मीटर रुंद आहे. या गर्डरचे छोटे सुटे भाग अंबाला (हरियाणा) येथे तयार केले जातात. सुमारे 500 ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग मुंबईत पोहोचले. सुटे भाग एकत्र करून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून ताफ्याच्या मदतीने वरळीत आणण्यात आले.

advertisement

14 हजार कोटींचा खर्च

कोस्टल रोड हा दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबईला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. बीएमसी आता ज्या तत्परतेने ते पूर्ण करण्यासाठी काम करत आहे, ते आधी झाले असते तर 2023 मध्येच मुंबईकरांना यातून प्रवास करण्याची संधी मिळू शकली असती. त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत याचा फायदा महायुतीला होवू शकतो. मुंबईकरांचे ट्राफिकचे हाल कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यात लक्ष घातलं होतं. आता जूनमध्ये पूर्ण क्षमतेने ते सुरू करण्याचे नियोजन बीएमसीने केले आहे. बीएमसीच्या दुर्लक्षामुळे कोस्टल रोडचा खर्च 8 हजार कोटींवरून 14 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आयुक्त भूषण गगराणी या प्रकल्पाकडे विशेष लक्ष देत आहेत, कारण त्यांना कोणत्याही किंमतीत त्याची मुदत वाढवायची नाही.

advertisement

श्रेय कोणाला?

कोस्टल रोड प्रकल्पाचा प्रस्ताव पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2013 साली मांडला होता. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली ती 2017-18 साली. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पद होतं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. शिवसेना युतीमध्ये त्यांच्यासोबत होती. पुढं मात्र चित्र पालटलं. 2019 ला राज्यात मोठा सत्ता प्रयोग झाला. महाविकास आघाडीचं सरकार बनलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, परंतु कोरोनाचा तडाखा बसला. कोरोनातून सावरल्यानंतरही प्रकल्पाला म्हणावं त्या वेगानं पुढं ढकलं गेलं नसल्याचा आरोप झाला. यादरम्यान विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने जोरदार टीका केली होती. अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून खाली खेचण्यात आलं. महायुती सत्तेत आली. आता त्यांच्या काळात हा प्रकल्प पुर्णत्त्वास जातोय.

मराठी बातम्या/मुंबई/
फडणवीसांचा ड्रीम प्रोजक्ट, असा उभारला 'कोस्टल रोड'; मुंबईकरांना आणखी एक स्पेशल गिफ्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल