TRENDING:

Shocking News : नवी मुंबई हादरली! एका चुकीच्या निर्णयाने हिरावली पोटची लेक; परिसरात खळबळ

Last Updated:

Navi Mumbai Shocking News: जर तुम्हीही कोणाच्या अनओळखी व्यक्तीकडून संपूर्ण माहिती न घेता उपचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. नेमके नवी मुंबई घडले आहे ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून उपचार करणाऱ्या एका भोंदू व्यक्तीच्या गंभीर निष्काळजीपणामुळे वाशी येथे तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कमी खर्चात उपचार करून देतो असे आमिष दाखवत या तरुणीवर चुकीची वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली होती.
woman dies after wrong injection by fake doctor
woman dies after wrong injection by fake doctor
advertisement

पदवी नसतानाही केले उपचार

मिळालेल्या माहितीनुसार,प्रचिती भुवड (वय 21) असे मृत तरुणीचे नाव असून ती वाशी परिसरात राहत होती. प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी कमी खर्चात उपचार मिळतील या विश्वासाने संदेश पाष्टे (वय 30) याच्याकडे संपर्क केला. संदेश हा अंधेरी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये ब्रदर म्हणून काम करत होता. मात्र वैद्यकीय पदवी नसतानाही त्याने स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवले.

advertisement

उपचाराच्या नावाखाली संदेशने प्रचितीला काही इंजेक्शने दिली. मात्र ही इंजेक्शने वैद्यकीय सल्ल्याविना आणि अयोग्य पद्धतीने दिल्याचा आरोप आहे. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती अधिकच खालावली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

तरुणीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा संशय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या घटनेनंतर कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. चौकशीत संदेश पाष्टे याच्याकडे डॉक्टर म्हणून उपचार करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणूक तसेच निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे भोंदू डॉक्टरांचा धोका पुन्हा एकदा समोर आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : नवी मुंबई हादरली! एका चुकीच्या निर्णयाने हिरावली पोटची लेक; परिसरात खळबळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल