मुंबई - अत्यंत उत्साहात गणोशोत्सव पार पडल्यानंतर अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. या दरवर्षी या गणेशोत्सवानंतर निर्माल्याची सर्वात जास्त मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवणे, खत बनवण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने पाठिंबा दिला आहे. बचत गटाच्या महिलांना एकत्र घेऊन पालिकेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षीही महापालिकेच्या वतीने अशी कामगिरी करण्यात आली.
advertisement
वसई विरार शहर महानगरपालिकेचा इको गणेशा-वसुंधरेच्या संवर्धनासाठी हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाते आहे. यंदा संपूर्ण वसई विरारमधील निर्माल्य कलशातून एकूण 32 हजार 600 किलो निर्माल्य जमा झाले. यामध्ये 8 बचत गटाच्या महिला 57 महिला या खत निर्मिती आणि धूप, अगरबत्ती अशा गृहोपयोगी वस्तू बनवत आहेत. या वस्तुंची आणि खताची विक्री शहरातील हजारो बचत गटाच्या महिला करतात.
ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंत, बीडचा शेतकरी मालामाल, वर्षाला कमावतोय 11 लाखांचं उत्पन्न, VIDEO
खताचा वापर महापालिकेच्या बागांमध्ये वापरले जाते, तर नागरिक आणि शेतकऱ्यांना विक्री केली जाते. यासह प्रदर्शनांमध्येही विक्री केली जाते. या उपक्रमामुळे नद्या, समुद्रात वाया जाणाऱ्या निर्माल्याचा सदुपयोग होतो. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्याही सक्षम होत आहेत.
pitru paksha 2024 : पितृपक्षातील ‘या’ 4 तिथी फार महत्वाच्या, या दिवसात नेमकं काय करावं, VIDEO
पर्यावरणपूरक खतनिर्मिती तसेच महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या वसई विरार महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यामुळे अनेक महिलांना रोजगार लाभतो आहे तसेच त्यांचे सक्षमीकरण होण्यासही मदत होत आहे.