नेमकं काय घडलं होतं?
11 फेब्रुवारी रोजी संगीता भोईर या सायंकाळी रिक्षाने घरी जात होत्या. प्रवासादरम्यान आरोपीने रिक्षा बंद पडल्याचे कारण सांगून वाहन बाजूला थांबवले. त्यानंतर अचानक चाकू काढून त्यांच्या गळ्यावर हल्ला केला. आरोपीने त्यांचे मंगळसूत्र, सोनसाखळी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटून घटनास्थळावरून पळ काढला.
रिक्षावरील छोट्या गोष्टीतून उघड झाला गुन्हेगार
advertisement
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान रिक्षाच्या क्रमांकातील शेवटचे चार अंक मिळाले. त्यावरून इतर रिक्षाचालकांकडे चौकशी करण्यात आली. अखेर अक्षय बागडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
गुन्ह्यामागचं खरं कारण समोर
चौकशीदरम्यान कर्जाच्या ताणातून हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच रिक्षा जप्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
