TRENDING:

Loksabha Election 2024: मुस्लिम, अर्थसंकल्प आणि पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पण शरद पवारांच्या बोलण्याचा अर्थ काय?

Last Updated:

मुस्लीम आणि अर्थसंकल्प या विषयावर मोदींनी भाष्य केलं होतं. यावर पवारांनी प्रतिउत्तर दिलं आहे. पवारांच्या राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतले मुस्लीम नेते अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे पक्षात नव्याने मुस्लीम नेतृत्त्व तयार करण्याच्या विचारात पवार आहेत का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल झोरी, प्रतिनिधी
(पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार)
(पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार)
advertisement

राज्यातील लोकसभा निवडणूकीचं मतदान शेवटच्या टप्प्यात आलं आहे. 20 मेला राज्यातीला 13 जागांवर मतदान पार पडेल. यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई व लगतच्या क्षेत्रातील जागा आहेत. नाशिकच्या जागेवर ही 20 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीपुर्वी नाशिकच प्रचाराच्या केंद्रस्थानी आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधील एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. कॉंग्रेसवर त्यांनी विशेष टिका केली.  मोदींच्या सभेनंतर शरद पवार नाशिकला पोहोचले. त्यांनी मोदींवर प्रतिहल्ला केला. शिवाय मुस्लीम आणि अर्थसंकल्प या विषयावर मोदींनी भाष्य केलं होतं. यावर पवारांनी प्रतिउत्तर दिलं आहे. पवारांच्या राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतले मुस्लीम नेते अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे पक्षात नव्याने मुस्लीम नेतृत्त्व तयार करण्याच्या विचारात पवार आहेत का? हा प्रश्न आता विचारला जातोय.

advertisement

काय म्हणाले पवार?

नाशिकच्या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवल्याचं पहायला मिळालं. सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, “मोदी आजकाल जे बोलतात त्यात एक टक्काही तथ्य नाही. त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, “मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचा रस शेतीच्या विकासावर होता, मात्र आता ते फक्त राजकारणावर बोलतात. अर्थसंकल्पातील 15 टक्के रक्कम मुस्लिमांसाठी ठेवण्याचा काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा मूर्खपणाचा असल्याचे पवार म्हणाले. पवार म्हणाले की, “अर्थसंकल्पात कधीच धर्म आणि जातीच्या आधारे वाटप करता येत नाही.”

advertisement

अर्थसंकल्प संपूर्ण देशासाठी

शरद पवार म्हणाले की, “केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संपूर्ण देशासाठी असतो, कोणत्याही जाती-धर्माचा नाही. पंतप्रधान मोदींनी 15 मे रोजीच्या सभेत म्हटलं होतं की, अल्पसंख्याकांसाठी 15 टक्के निधीची तरतूद करून काँग्रेसला देशाचा अर्थसंकल्प मुस्लिम आणि हिंदू अर्थसंकल्पात विभागायचा आहे. विरोधी 'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यानंतर तुष्टीकरणाचे हे धोरण राबवेल, असा दावा त्यांनी केला. असे कधीच होऊ शकत नाही, असे पवार नाशिकमध्ये म्हणाले. पंतप्रधान मोदी दिशाभूल करत असल्याचं पवारांनी सांगितलं.

advertisement

उद्धव यांचा पक्ष छोटा आहे का?

अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं पवार म्हणाले होते. त्यांच्या विधानाबाबत पवारांना विचारले असता ते म्हणाले की, विचारधारा समान असेल तर राजकीय पक्षांचे विलीनीकरण व्हायला हवे. ते म्हणाले की, “माझ्या वक्तव्यावर मोदी इतके नाराज का आहेत? मी उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल बोललो नाही, तो पक्ष छोटा आहे का? गेल्या विधानसभा निवडणुकीत (आमच्यापेक्षा) जास्त जागा मिळाल्या होत्या.” शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्याच्या वक्तव्यावरही पंतप्रधान मोदींनी बोट ठेवलं होतं. यासोबतच भाजपनेही हा मुद्दा बनवला होता.

advertisement

विशिष्ट समुदायाचे राजकारण

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमांचा संदर्भ देत पवार म्हणाले की, “मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे ही चांगली कल्पना नाही. काल मोदी ज्या ठिकाणी गेले होते तो गुजरातीबहुल परिसर असल्याचे ते म्हणाले. ते एका विशिष्ट समाजावर लक्ष केंद्रित करत आहेत.” असं विधान पवारांनी केलं. भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदींचा रोड शो आयोजित केला होता. उमेदवारांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदींनी बुधवारी संध्याकाळी घाटकोपर भागात एक भव्य रोड शो केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतच्या अंदाजाबाबत विचारले असता पवार म्हणाले की, “बदल दिसत आहे. लोकांना बदल हवा आहे पण कोण किती जागा जिंकेल हे मी सांगू शकत नाही.”

मुस्लिम नेतृत्त्वासाठी

जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फुट पडली. अजित पवार हे महायुतीसोबत सत्तेत गेले. त्यांच्यासोबत अनेकांनी शपथ घेतली. मात्र, लक्ष वेधून घेतलं ते हसन मुश्रीफ यांनी. हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर आघाडीतील शिंदे गट आणि भाजप आक्रमक राजकारण करतो आहे. असं असतानाही अजित पवारांसोबत मुश्रीफ सत्तेत सामील झाले. महायुतीत मंत्री ही झाले. यामुळं राज्यात मोठा संदेश गेला. मुद्द्याच्या राजकारणासाठी मुस्लीम समाज भाजपसोबत जावू शकतो. हा संदेश देण्यात आला. मात्र, खरी गंमत घडली ती हिवाळी अधिवेशनात. या अधिवेशनादरम्यान माजी मंत्री नवाब मलिकांची सुटका झाली. ते अधिवेशनात उपस्थित राहिले. शिवाय ते सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर बसले. मलिकांनी अप्रत्यक्षरित्त्या अजित पवारांना पाठिंबा दिल्याचं पहायला मिळालं. भाजपनं केलेल्या आरोपामुळे मलिकांना तुरुंगवास झाला होता.तरी ते भाजपप्रणित सरकारात सामील झाले.

यामुळे राज्यात मुस्लीम मतदारांना अजित पवारांच्या रुपात महायुती आकर्षित करत आहे. याची जाणीव झाल्यामुळेच शरद पवारांनी तुष्टीकरणाच्या आरोपांना खोडून काढलं असल्याचं बोललं जातंय. मुश्रीफ आणि मलिकांनी साथ सोडल्यानंतर नव्या मुस्लीम नेत्यांची गरज पवारांना भासते आहे. त्यामुळे पवार पंतप्रधान मोदींची प्रतिमा मुस्लीमविरोधी असल्याचं अधोरेखित करत आहेत, अशी टीका होते आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Loksabha Election 2024: मुस्लिम, अर्थसंकल्प आणि पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पण शरद पवारांच्या बोलण्याचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल