TRENDING:

Mumbai News : ओला-उबरचा पत्ता कट होणार; परिवहन विभागाचा मोठा निर्णय

Last Updated:

New Cab Service App In Maharashtra : महाराष्ट्रात लवकरच एक नवीन कॅब सेवा सुरू होणार आहे. एसटी महामंडळामार्फत चालवण्यात येणाऱ्या या सेवेमुळे प्रवाशांना नवे पर्याय मिळणार असून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शहरात असो वा शहराबाहेर प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक ओला किंवा उबर या अॅपचा वापर करत असतात. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे नागरिकांना ही सेवा त्रासदायक ठरत आहेत. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक नव टॅक्सी अॅप सुरु होणार आहे.
Chhava Ride app launch in Maharashtra
Chhava Ride app launch in Maharashtra
advertisement

ओला-उबरला जोरदार झटका

सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या भारत टॅक्सीच्या उद्घाटनानंतर अॅप आधारित कॅब सेवांच्या क्षेत्रात मोठी हालचाल सुरू झाली आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देणारे आणखी एक शासकीय अॅप लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. छावा राइड या नावाने ही नवी अॅप आधारित कॅब सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

advertisement

परिवहन विभागाचा मोठा निर्णय

राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने आणि एसटी महामंडळामार्फत छावा राइड अॅप सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमातून एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी टॅक्सी सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे.

कधी सुरु होणार ही सेवा?

या प्रकल्पासाठी विशेष समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल या महिन्याअखेर अपेक्षित आहे. त्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सध्या राज्यात खासगी अॅप आधारित टॅक्सी सेवांची मक्तेदारी असून प्रवाशांना अनेकदा जादा दर आणि सेवेबाबत तक्रारींचा सामना करावा लागतो.

advertisement

राज्यातील युवकांना मिळणार कामाची संधी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

मुंबईसह संपूर्ण राज्यात भारत टॅक्सी आणि छावा राइड सुरू झाल्यास प्रवाशांना पर्याय उपलब्ध होतील तसेच स्पर्धेमुळे सेवा दर्जात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या अॅपद्वारे राज्यातील मराठी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : ओला-उबरचा पत्ता कट होणार; परिवहन विभागाचा मोठा निर्णय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल