TRENDING:

Mumbai Water Cut : मुंबईत पाणीकपातीचं मोठं संकट,मंगळवारी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

Last Updated:

Mumbai Water Cut News : मुंबईच्या पाली हिल जलाशयाच्या जलवाहिनीत गळती आढळल्याने शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मात्र याचा अधिक त्रास कोणत्या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईकरांनो लक्ष द्या पाण्याच्या बाबतीत हाल होणार आहेत, कारण काही दिवस मुंबईत शहराच्या काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पण नेमका किती दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे आणि याचे नेमके कारण काय असणार आहे ते जाणून घ्या.
Bandra West 14 hours water supply shutdown
Bandra West 14 hours water supply shutdown
advertisement

पाली हिल जलाशयाच्या जलवाहिनीत गळती

पाली हिल जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आढळून आल्याने मुंबई महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही जलवाहिनी वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडातून तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने पाणी वाया जात असून संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेने दुरुस्तीचे काम तातडीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement

कधीपर्यंत सुरु राहणार काम?

हे दुरुस्ती काम मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण होईल असा दावा जल अभियंता विभागाने केला आहे. या कालावधीत एच पश्चिम विभागातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तब्बल 14 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

advertisement

'या' भागात पाणीपुरवठा पूर्ण बंद

वांद्रे पश्चिमेतील हिल रोड, पेरी रोड, कार्टर रोड, पाली गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव, कांतवाडी परिसर, खार दांडा, कोळीवाडा, चुईम गावठाण, पाली हिल, युनियन पार्क, तसेच खार पश्चिमेतील काही रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय चॅपल रोड, के. सी. रोड, एल. के. मेहता मार्ग, नर्गिस दत्त रोड, पाली माला परिसरातील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.

advertisement

दरम्यान हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. रोड, एच. के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असून मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4.30 या वेळेत पाणी दिले जाईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

महापालिकेने नागरिकांना दुरुस्तीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याचे आणि पुढील काही दिवस खबरदारी म्हणून पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut : मुंबईत पाणीकपातीचं मोठं संकट,मंगळवारी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल