जमुई, 3 ऑक्टोबर : तुम्ही कधी कोणाशी पैज लावलीये का? काही लोक पैज लावताना अजिबात मागचा-पुढचा विचार करत नाहीत. दोन मजुरांनीसुद्धा अशीच एक पैज लावली होती. त्यात असं ठरलं होतं की, जो जास्त पुऱ्या खाईल तो विजेता ठरेल. मग काय दोन्ही मजूर एखाद्या योद्ध्याप्रमाणे रणांगणात उतरले आणि पुऱ्यांवर तुटून पडले.
advertisement
ही पैज लागली होती बिहारच्या जमुई रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे यार्डमध्ये. जिथे ट्रेनमधून प्रवाशांचं सामान उतरवण्याचं काम हे मजूर करतात. त्यांच्यामध्ये जो जास्त जेवतो, तो विजेता असतो. यावेळी पुऱ्या खाण्याची पैज शेखपुराचे रहिवासी नागो राम आणि बरियारपूरचे रहिवासी डल्लू यादव यांच्यामध्ये लागली होती. पैज लागताच दोघंही जवळच्या एका दुकानात गेले. तिथून त्यांनी भजी, कचोरी आणि पुरी आणली.
नाशिकच्या 'या' टॉप 6 मिसळ खाल्ल्या आहेत का?
दोघांनी खायला सुरुवात करताच हळूहळू बघ्यांची गर्दीही होऊ लागली. इतर मजूर दोन्ही मजुरांना जिंकण्यासाठी प्रोत्साहित करत होते. इतक्यातच बाकीचे सर्व पदार्थ मागे पडले आणि पुऱ्या खाण्याची स्पर्धा सुरू झाली. महत्त्वाचं म्हणजे यात सहभागी केवळ दोन मजूर होते, मात्र इतर मजुरांचा उत्साह पैज लावणाऱ्या मजुरांपेक्षा काही कमी नव्हता.
पितृपक्षात पाळा पथ्य, चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा पितरं होतील नाराज!
अखेर दोन्ही मजूर बाजूला झाले, आता एकही पूरी ते खाऊ शकत नव्हते. शेखपुराचे रहिवासी नागो राम यांनी ही पैज जिंकली. त्यांनी एकामागून एक तब्बल 81 पुऱ्या खाल्ल्या. याबाबत सध्या आसपासच्या परिसरात मोठी चर्चा आहे.