सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NDA नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. 8 जून रोजी नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. तर एनडीएच्या सर्व खासदारांच्या बैठकीत मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासा पाठिंबा देण्यात आला आहे.
advertisement
वाचा - NCP : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अजितदादांचे 10-12 आमदार परतीच्या वाटेवर!
शिंदे गटाला काय मिळणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 8 जूनला सायंकाळी शपथविधी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्री देखील त्याच दिवशी शपथ ग्रहण करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद मिळणार मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहे. अजित पवार गटाला काय मिळणार? याची उत्सुकता आता लागली आहे.