भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख का निवडली गेली होती?
उत्तर : 15 ऑगस्ट ही तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी निवडण्यात आली होती. कारण ती तारीख जपानच्या मित्रराष्ट्रांच्या आत्मसमर्पणाच्या दुसऱ्या वर्धापनदिनाची तारीख होती. ही तारीख लॉर्ड माउंटबॅटन यांनी निवडली होती.
इंग्रजांनी भारतावर किती वर्षं राज्य केलं होतं?
उत्तर - इंग्रजांनी भारतावर जवळपास 200 वर्षं राज्य केलं होतं.
advertisement
जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं होतं?
उत्तर - 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं.
मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजी कधी निघाले होते आणि ते दांडीला केव्हा पोहोचले होते?
उत्तर - महात्मा गांधी 12 मार्च 1930 रोजी निघाले होते आणि ते 5 एप्रिल 1930 रोजी दांडी इथे पोहोचले होते.
भारत छोडो आंदोलन कधी झालं?
उत्तर - 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन झालं होतं.
गांधी इर्विन करार केव्हा झाला होता?
उत्तर - गांधी इर्विन करार 5 मार्च 1931 रोजी झाला होता.
सायमन कमिशन भारतात केव्हा आलं होतं?
उत्तर : सायमन कमिशन भारतात 1927 मध्ये आलं होतं.
भारत छोडो ठराव मंजूर झाल्यानंतर गांधीजींना कुठे तुरुंगात कैद करण्यात आलं होतं?
उत्तर : भारत छोडो ठराव मंजूर झाल्यानंतर गांधीजींना आगा खान पॅलेसमध्ये कैद करण्यात आलं होतं.
ते क्रांतिकारक कोण होते, जे नंतर महान योगी झाले?
उत्तर - अरविंद घोष
मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याची मागणी सर्वांत आधी कोणत्या वर्षी केली होती?
उत्तर - मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याची मागणी 1940मध्ये केली होती.
