'गोव्याचे किनाऱ्याव' फेम प्रसिद्ध गायिका लग्नबंधनात! कोण आहे शुभांगी केदारचा नवरा, करतो काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Singer Shubhangi Kedar Got Married : 'गोव्याच्या किनाऱ्यावर' फेम प्रसिद्ध गायिकेनं नुकतंच लग्न केलं. तिच्या लग्नाचा फोटो समोर आल्यानंतर तिचा नवरा कोण आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
advertisement
1/8

मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार लग्न करत आहेत. नुकतंच अभिनेता अथर्व कर्वे आणि अभिनेत्री साक्षी यांनी लग्न केलं. रील लाईफनंतर रिअल लाईफमध्येही अथर्व आणि साक्षी एकमेकांचे नवरा बायको झाले.
advertisement
2/8
अथर्व आणि साक्षी यांच्यानंतर गोव्याच्या किनाऱ्यावर फेम गायिका शुभांगी केदार हिनं देखील लग्न केलं आहे. तुझे नजरच्या जाल्यामंदी कालीज गुतल आज... म्हणत सगळ्यांची मनं जिंकणारी शुभांगी केदार नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
advertisement
3/8
शुभांगी केदारने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. शुभांगी गेली अनेक दिवस तिच्या लग्नाची तयारी करत होती. अनेक स्टोरी शेअर करत तिनं ही माहिती दिली होती.
advertisement
4/8
शुभांगीनं तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न केलं. दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. प्रणित वानवे असं शुभांगीच्या नवऱ्याचं नाव आहे.
advertisement
5/8
शुभांगी केदारचा नवरा प्रणित वानवे देखील कलाकार आहे. तो क्रिएटिव्ह कन्सल्टन्ट म्हणून काम करतो. शुभांगीच्या अनेक म्युझिक अल्बममध्ये त्याने मदत केली आहे.
advertisement
6/8
गायिका शुभांगी केदार गेली अनेक वर्ष म्युझिक इंडस्ट्रीत काम करतेय. 'गोव्याच्या किनाऱ्यावर' हे गाणं खूप लोकप्रिय झालं. हे एव्हरग्रीन गाणं म्हणून ते ओळखलं जातं.
advertisement
7/8
'गोव्याच्या किनाऱ्यावर' या गाण्यातून शुभांगी घराघरात पोहोचली. सोशल मिडियाचं प्रस्त वाढण्याच्या आधी युट्यूबवर हे गाणं प्रचंड हिट ठरलं होतं.
advertisement
8/8
शुभांगी सोशल मीडियावर सक्रीय असते. अनेक जुनी मराठी, हिंदी गाणी, ट्रेंडिंग इंग्लीश गाणी, स्वत: लिहिलेली गाणी ती गात असते. अनेक सिनेमांसाठीही शुभांगीनं गाणी गायली आहेत. 2017 पासून शास्त्रीय संगीत शिकतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'गोव्याचे किनाऱ्याव' फेम प्रसिद्ध गायिका लग्नबंधनात! कोण आहे शुभांगी केदारचा नवरा, करतो काय?