घरात लावा 'ही' 5 झाडं, घर राहील थंड अन् मिळेल शुद्ध हवा; कमी खर्चात मिळेल जास्त आराम
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उन्हाळ्यात घराचे तापमान खूप वाढते आणि त्यामुळे एसी, कूलर सतत चालवावे लागतात. पण काही खास झाडांच्या मदतीने तुम्ही घर नैसर्गिकरीत्या थंड ठेवू शकता. फर्न प्लांट घराला नवीन ऊर्जा देतो आणि...
advertisement
1/6

उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवू लागतो. अशा परिस्थितीत घरात दिवसभर एसी, कूलर, पंखे चालवल्याने विजेचं बिल वाढू लागतं, पण आज आम्ही तुम्हाला अशा काही झाडांबद्दल सांगणार आहोत, जी तुमचं घर थंड ठेवतात आणि या झाडांची काळजी घेणंही खूप सोपं आहे. याच्या मदतीने तुम्ही घर थंड ठेवू शकता आणि घरातील प्रदूषित हवा पूर्णपणे शुद्ध ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या झाडांबद्दल...
advertisement
2/6
फर्न (Fern) : फर्नचं झाड घरात नक्की लावा. या झाडाची पानं दिसायला खूप सुंदर असतात आणि हे झाड हवा शुद्ध करतं आणि घराला नवी ऊर्जा देतं. उन्हाळ्यातही उष्णतेचा यावर जास्त परिणाम होत नाही. या झाडाला चांगल्या निचऱ्याची माती लागते. हलक्या सेंद्रिय मातीच्या मिश्रणानेही तुम्ही हे झाड लावू शकता.
advertisement
3/6
एरेका पाम (Areca palm): एरेका पाम हे सुंदर पानांचं इनडोअर प्लांट आहे. ते घरात लावल्याने घर थंड राहतं. सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात आनंद टिकून राहतो. या झाडाला जास्त देखभालीची गरज नसते. ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात सहज लावता येतं. वास्तुशास्त्रानुसारही हे झाड खूप शुभ मानलं जातं.
advertisement
4/6
ड्रेकेना (Dracaena) : ड्रेकेनाचं झाड घरामध्ये सहज ठेवता येतं. या झाडाची पानं दिसायला सुंदर असतात. त्याच्या पानांच्या मधला हिरवा रंग आणि दोन्ही कडील लाल रंग सौंदर्य अधिक वाढवतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्याचबरोबर नासाने या झाडाला एअर प्युरिफायरसाठी पूर्णपणे योग्य मानले आहे. हे झाड घरात लावल्याने घरातील वातावरण ताजेतवाने राहील.
advertisement
5/6
कोरफड (Aloe vera) : तुम्ही हे झाड तुमच्या घरात सहज लावू शकता. कोरफडीचं झाड कमी काळजीमध्येही सहज जिवंत राहतं. खरं तर या झाडाला कधीतरी पाण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही कधीतरी पाणी देऊन ते सहज ताजं ठेवू शकता. हे झाड ठेवल्याने शुद्ध हवेसोबतच तुमच्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण राहील आणि उन्हाळ्यातही थंडावा मिळेल.
advertisement
6/6
ॲलोनिमा (Aglaonema) : तुम्ही हे झाडही तुमच्या घरात सहज लावू शकता. कमी देखरेखेमध्येही ॲलोनिमाचं झाड सहज राहील. खरं तर या झाडाला कधीतरी पाण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही कधीतरी पाणी देऊन ते सहज ताजं ठेवू शकता. हे झाड ठेवल्याने तुमच्या घरात शुद्ध हवेसोबत आनंदाचं वातावरणही नेहमी राहील आणि ते उन्हाळ्यातही थंडावा देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
घरात लावा 'ही' 5 झाडं, घर राहील थंड अन् मिळेल शुद्ध हवा; कमी खर्चात मिळेल जास्त आराम