आरोग्यवर्धक कारल्यापासून घरीच तयार करा चिप्स; पाहा रेसिपी पद्धत
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
कारल्याचे चिप्स करून खाल्ल्यास कडवटपणा टाळता येतो आणि ते एकदम टेस्टी लागतात.
advertisement
1/6

प्रत्येकाला आहारात एखादा पदार्थ अधिक आवडतो तर एखादा अजिबात आवडत नाही. कारल्याची भाजी आरोग्यदायी असली तरी त्याच्या कडवट चवीमुळे अनेकजण ती टाळतातच.
advertisement
2/6
पण आहारात कारल्याचा समावेश गरजेचा असतो. त्यासाठी एक भन्नाट रेसिपी आहे. कारल्याचे चिप्स करून खाल्ल्यास कडवटपणा टाळता येतो आणि ते एकदम टेस्टी लागतात. हीच रेसिपी <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितलीय.
advertisement
3/6
कारल्याच्या चिप्ससाठी घरातीलच साहित्याची आवश्यकता असते. यात 4-5 कारले, चण्याच्या डाळीचं पीठ अर्धा वाटी, अंदाजे 1 वाटी तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर(हवं असल्यास), लाल तिखट, हळद, आमसूल पावडर, मीठ, जिरे पावडर, पाणी आणि तेल या साहित्यात आपण टेस्टी असे कारल्याचे चिप्स बनवू शकता.
advertisement
4/6
प्रथम कारली धुवून बारीक गोल किंवा लांबट अशाप्रकारे अपल्याला पाहिजे त्या आकारात काप करून घ्यावी. नंतर त्याला मीठ लावून 2-3 तास सुकू द्या. एका भांड्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोर, चणा डाळ पीठ, तिखट, हळद, मीठ, आमचूर पावडर, जीरेपूड ऍड करा. थोड्या थोड्या पाण्याने भिजवून घ्या. जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नको. त्यात कारली टाकून छान एकत्रित करा.
advertisement
5/6
एका कढईत तेल चांगलं गरम करून त्यात कारल्याचे चिप्स कमी गॅस वर तळून घ्यावे. 5-7 मिनिटे तळून घेऊन त्याला लाल रंग आल्यावर काढून घ्या. हे चिप्स अजिबात कडू लागणार नाहीत, असे शोभाताई सांगतात.
advertisement
6/6
कारल्यामध्ये असलेले गुणधर्म आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोडच आहेत. त्यामुळे तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कारल्याचे चिप्स खाऊन बघा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
आरोग्यवर्धक कारल्यापासून घरीच तयार करा चिप्स; पाहा रेसिपी पद्धत