अनेक आजारांवर रामबाण! रक्त आणि हृदय सुदृढ ठेवतं तुळशीचं पान
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या रोजच्या सवयीच आपल्याला सुदृढ ठेवू शकतात. स्वयंपाकघरात, निसर्गात असे अनेक पदार्थ, फळं, फुलं, झाडं असतात ज्यांच्या सेवनाने आपण विविध आजारांवर मात करू शकतो. तुळशीचं रोप तर सर्वोत्तम. आयुर्वेदात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
1/5

तुळशीच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असतं. शिवाय यातून आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए आणि ईदेखील मिळतं. तुळस अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक्स गुणांनी परिपूर्ण असते.
advertisement
2/5
तुळशीच्या पानांमुळे अनेक आजार बरे होतातच, मात्र केस आणि त्वचेसाठीदेखील ही पानं फायदेशीर असतात.
advertisement
3/5
हिवाळ्यातील ताप, सर्दी, खोकल्यासारख्या साथीच्या आजारांमध्येही तुळशीच्या पानांमुळे आराम मिळतो. तुळशीत असलेल्या यूजेनॉलमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. परिणामी विविध आजारांचा समर्थपणे सामना करता येतो.
advertisement
4/5
आयुर्वेदाचार्य एल एम मिश्रा सांगतात की, तुळशीची पानं दिसायला लहान असली तरी त्यांचे फायदे मोठे आहेत. ही लहान-लहान पानं शरिरातलं कोलेस्ट्रॉल कमी करतात. रक्तातली साखर नियंत्रणात ठेवतात. शिवाय हृदय आणि रक्तदाबासाठीही ही पानं गुणकारी असतात.
advertisement
5/5
तुळशीचा रस, तुळशीचं पाणी किंवा तुळशीचा चहा प्यायचा सल्ला तज्ज्ञ देतात. तुळशीच्या पानांमुळे चहा स्वादिष्ट होतो आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. खरंतर एवढ्या सगळ्या फायद्यांसाठी घरात तुळशीचं रोप असायलाच हवं.