TRENDING:

Nutrition Gardens: तब्बल 200 पोषण बागांची निर्मिती, 28 प्रकारच्या भाज्या, जालन्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तरी काय?

Last Updated:
सेंद्रिय पद्धतीच्या तब्बल 200 पोषण बागांची निर्मिती जालन्यात कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने करण्यात आली आहे. पाहुयात काय आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना.
advertisement
1/7
200 पोषण बागांची निर्मिती, 28 प्रकारच्या भाज्या, जालन्यातील उपक्रम आहे तरी काय?
रसायनमुक्त अन्न स्वप्नांचे महत्त्व आपल्याला कोविड काळात चांगलेच समजले. त्यामुळे प्रत्येक जण आता शुद्ध रसायनमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य सेवनावर भर देत आहे.
advertisement
2/7
यालाच अनुसरून सेंद्रिय पद्धतीच्या तब्बल 200 पोषण बागांची निर्मिती जालन्यात कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने करण्यात आली आहे. पाहुयात काय आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना.
advertisement
3/7
सेंद्रिय पद्धतीने पोषण बाग कशी तयार करावी, तिचे आरोग्यविषयक फायदे याबाबत महिलांना मार्गदर्शन केले जाते. गेल्या पाच वर्षामध्ये महिलांनी स्वतःच्या भाजीपाल्याची गरज भागवण्यासाठी सेंद्रिय पोषण बाग लागवड सुरू केली आहे. 200 हून अधिक महिलांनी याचा लाभ घेऊन नैसर्गिक आणि विषमुक्त पोषणबाग फुलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
advertisement
4/7
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 100 पेक्षा अधिक महिलांना 28 प्रकारच्या भाज्यांचा बियाणे संच आणि आंबा, लिंबू, जांभूळ, सीताफळ, कढीपत्ता यांसारख्या फळझाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली आहेत. यात पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय, शेंगवर्गीय आणि कंद भाज्यांचा यात समावेश आहे.
advertisement
5/7
2018 मध्ये प्रथमच प्रात्यक्षिक पद्धतीने हा प्रयोग राबवला गेला. त्यानंतर महिलांनी एक गुंठा क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड सुरू केली. लिंबोळी अर्क, शेणखत, गांडूळ खत, गोमूत्र आणि जीवामृत वापर करून त्यांनी भाजीपाल्याची उत्पादनक्षमता वाढवली आहे.
advertisement
6/7
महिलांनी उपलब्ध जागेत पोषण फळबाग आणि भाजीपाल्याची लागवड करावी. रोज लागणाऱ्या भाजीपाल्याची गरज पूर्ण करावी. यामुळे कुटुंबातील सर्वांच्या आरोग्यास चांगला फायदा झाल्याचे दिसून येईल. खरपुडी येथील कृषी तज्ञ डॉ. एस. एन. कहऱ्हाळे, यांनी सांगितलं.
advertisement
7/7
सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या पोषण बागेमुळे दररोजचा भाजीपाला सहज उपलब्ध होतो. शेणखत, गांडूळखत आणि पारंपरिक जैविक पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्यामुळे शरीर निरोगी राहते. कुटुंबाच्या आरोग्यास याचा चांगला फायदा होतो, असं पोषण बाग फुलविणाऱ्या महिला शेतकरी अरुणा जाधव यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
Nutrition Gardens: तब्बल 200 पोषण बागांची निर्मिती, 28 प्रकारच्या भाज्या, जालन्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल