'या' 7-सीटर MPVवर मिळतंय 2.15 लाखांचं डिस्काउंट! देते 23.24 KM मायलेज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Suzuki Invicto वर सध्या ₹2.15 लाखांपर्यंत जबरदस्त डिस्काउंट मिळतंय. ज्यामुळे ही प्रीमियम 7-सीटर MPV आणखीच व्हॅल्यू-फॉर-मनी मानली जातेय. लग्जरी इंटीरियर, दमदार हायब्रिड इंजिन आणि 23.24 kmpl मायलेजसह Invicto फॅमिली कार सेगमेंटमध्ये मोठा ऑप्शन आहे.
advertisement
1/6

Maruti Suzuki Invicto भारतीय मार्केटमध्ये MPV सेगमेंटमध्ये खुप प्रसिद्ध आहे. याची एक्स-शोरुम किंमत ₹24.97 लाखांपासून सुरु होते. तुम्ही येणाऱ्या काळात नवीन इनविक्टो खरेदीचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. खरंतर मारुती आपल्या या 7-सीटर कारची सेल वाढवण्यासाठी यावर 2.15 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करत आहे.
advertisement
2/6
NEXA शोरूम्समधून विकल्या जाणाऱ्या Premium MPV वर कंपनी कॅश डिस्काउंटच्या स्वरुपात 50,000 रुपये देत आहे. सोबतच एक्सचेंज बोनस 1,00,000 रुपये किंवा स्क्रॅपेज बोनस 1,15,000 रुपये (यामधून एक निवडू शकता) उपलब्ध आहे. जुन्या मारुती मालकांसाठी लॉयल्टी बोनस 50,000 रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट 15,000 रुपयांपर्यंत मिळू शकतो. या सर्व ऑफर्स मिळून जास्तीत जास्त बचत 2.15 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. चला याच्या डिझाइन, इंटीरियर, फीचर्स, सेफ्टी, इंजिन आणि मायलेज डिटेल्सवरही नजर टाकूया.
advertisement
3/6
डिझाइन आणि इंटीरियर : इनव्हिक्टोच्या बाह्य भागामध्ये प्रीमियम आणि आधुनिक डिझाइन आहे. त्यात मोठे क्रोम ग्रिल, एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, एक नवीन फ्रंट आणि रियर बंपर आणि शार्क-फिन अँटेना आहे. ते लांब आणि रुंद दिसते, ज्यामुळे रस्त्यावर एक मजबूत उपस्थिती निर्माण होते. त्याची लांबी 4755 mm, रुंदी 1850 mm, उंची 1795 mm आणि व्हीलबेस 2850 mm आहे, ज्याचा ग्राउंड क्लीयरन्स अंदाजे 185 mm आहे.
advertisement
4/6
केबिन खुप लग्जरी आणि स्पेसियस आहे. लेदरेट सीट्स, एम्बिएंट लायटिंग, कप्पर इंसर्ट्स, पॅनोरमिक सनरुफ, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड आणि व्हेंटिलेडेट फ्रंट सीट्स, सेकेंड रोमध्ये कॅप्टेन सीट्स, (7-सीटरमध्ये) आणि पॉवर्ड टेलगेट सारखे फीचर्स आहेत. हे 7-8 सीटर ऑप्शनमध्ये येते. ज्यामध्ये खुप लेग रुम आणि हेड रुम मिळते. थर्ड रोही कम्फर्टेबल आहे.
advertisement
5/6
फीचर्स आणि सेफ्टी : इनव्हिक्टोमध्ये 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह), क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरिंग), वायरलेस चार्जिंग आणि सुझुकी कनेक्ट (रिमोट फंक्शन्स आणि ई-कॉल) यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. सुरक्षा फीचर्समध्ये सहा एअरबॅग्ज (समोर, बाजूला आणि पडदा), ईबीडीसह एबीएस, ईएससी, हिल होल्ड असिस्ट आणि टीपीएमएस यांचा समावेश आहे.
advertisement
6/6
इंजिन आणि मायलेज : इनव्हिक्टोमध्ये 1987 cc (2.0-लीटर)स्ट्राँग हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे. जे e-CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. हे इंजिन 150 bhp पॉवर आणि 188 Nm टॉर्क देते. तर हायब्रिड सिस्टमसह कॉम्बाइंड आउटपूट 184-186 bhp पर्यंत पोहोचते. ARAI क्लेम्ड मायलेज 23.24 kmpl आहे. हे सेल्फ-चार्जिंग हायब्रिड आहे. कोणताही प्लग-इन नाही आणि याची फ्यूल एफिशिएन्सी खुप चांगली आहे.