TRENDING:

वाकडचा श्वास मोकळा....! आयटी पार्कला जाणारा रस्ता आता सुसाट; पुणे महापालिकेची मोठी कारवाई

Last Updated:

रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या म्हातोबानगर येथील शेकडो झोपड्यांवर महापालिकेने बुलडोझर चालवून रस्ता मोकळा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे:  वाकड परिसरातील अत्यंत गजबजलेल्या दत्त मंदिर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज मोठी कारवाई केली. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या म्हातोबानगर येथील शेकडो झोपड्यांवर महापालिकेने बुलडोझर चालवून रस्ता मोकळा केला आहे. यामुळे या भागातील श्वास मोकळा झाला असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
News18
News18
advertisement

पिंपरी चिंचवड महापालिकेने ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे 45 मीटर रुंदीच्या रस्ते विकासाचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. वाकडमधील दत्त मंदिर रोडवर वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याचे 45 मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने बराच काळ आधी केले होते. मात्र, म्हातोबानगर येथील झोपडपट्ट्यांमुळे हे काम रखडले होते.

महापालिकेने प्रथम या झोपडपट्टीतील नागरिकांचे कायदेशीररित्या पुनर्वसन केले. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अवजड मशिनरी आणि पोलीस बंदोबस्तात या झोपड्या जमीनदोस्त केल्या. दत्त मंदिर रस्ता हा वाकडमधील मुख्य अंतर्गत रस्ता असून तो हिंजवडी आयटी पार्क आणि महामार्गाला जोडला जातो. अरुंद रस्त्यामुळे येथे तासनतास वाहतूक कोंडी होत होती.

advertisement

वाकड परिसरातील वाहतुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

वाकडमधील दत्त मंदिर रोड हा अत्यंत महत्त्वाचा अंतर्गत रस्ता मानला जातो. हा रस्ता हिंजवडी आयटी पार्क आणि महामार्गाला जोडला जात असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याचे 45 मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने बराच काळ आधी केले होते. मात्र, म्हातोबानगर येथील झोपडपट्ट्यांमुळे हे काम रखडले होते. अखेर महापालिकेने या झोपडपट्टीतील नागरिकांचे कायदेशीररित्या पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर ही कारवाई केली आहे. दत्त मंदिर रस्ता अरुंद असल्यामुळे येथे तासनतास वाहतूक कोंडी होत होती. आता रस्ता रुंद झाल्यामुळे आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या कारवाईमुळे वाकड परिसरातील वाहतुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
वाकडचा श्वास मोकळा....! आयटी पार्कला जाणारा रस्ता आता सुसाट; पुणे महापालिकेची मोठी कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल