TRENDING:

APMC Market: लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video

Last Updated:

उन्हाळी कांद्याचा सरासरी भाव 800 ते 1051 रुपये दरम्यान राहिला. पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव प्रतिक्विंटल प्रमाणे 1000 ते 1200 रुपये दरम्यान सर्वाधिक राहिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: आज 7 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 13 हजार 649 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 80 हजार 903 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास 1051 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी बाजारभाव मिळाला. तसेच बाजारातील उन्हाळी कांद्याचा सरासरी भाव 800 ते 1051 रुपये दरम्यान राहिला. पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव प्रतिक्विंटल प्रमाणे 1000 ते 1200 रुपये दरम्यान सर्वाधिक राहिला.
advertisement

लिंबूची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 1050 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 444 क्विंटल लिंबूस 3000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 21 क्विंटल लिंबूस 11771 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक

आज 1552 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 708 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 9500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर बाजारात आवक झालेल्या 34 क्विंटल द्राक्षास 5500 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आजची द्राक्ष आवक 500 क्विंटलने वाढली.

advertisement

केळीची आवक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

मुंबई मार्केटमध्ये 19 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2400 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची 201 क्विंटल केळीची एकूण आवक राहिली. यापैकी पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 135 क्विंटल केळीस 2350 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर बाजारात आवक झालेल्या 31 क्विंटल केळीस 525 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल