advertisement

Success Story : 10 गुंठ्यात पिकवलं पिवळं सोनं, सात महिन्यांत लखपती, शेतकऱ्यानं कसा केला प्रयोग यशस्वी?

Last Updated:

यासाठी सीताराम यांना जवळपास 35 हजार रुपये पर्यंतचा खर्च आला आहे. तर खर्च वजा करून सात महिन्यांमध्ये एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.

+
News18

News18

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज गावातील उच्चशिक्षित तरुण शेतकरी सीताराम पाटील यांनी प्रथमच दहा गुंठ्यामध्ये हळदीचा प्रयोग केला आहे. यासाठी सीताराम यांना जवळपास 35 हजार रुपये पर्यंतचा खर्च आला आहे. तर खर्च वजा करून सात महिन्यांमध्ये एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. प्रयोग म्हणून लावलेल्या हळदीचा उत्पन्न अधिक मिळाल्याने क्षेत्र वाढवणार असल्याची माहिती प्रयोगशील शेतकरी सिद्धाराम पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
हिरज गावातीलच शेतकरी सीताराम पाटील यांचे शिक्षण एम. कॉम पर्यंत झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सहजा सहज कोणीही हळदीची शेती करत नाही पण प्रथमच प्रयोग म्हणून सिताराम यांनी दहा गुंठ्यामध्ये कोल्हापूर येथून हळदी पिकाचे बियाणे आणून हळदीची लागवड केली. जवळपास जून 2025 मध्ये कोल्हापुरातून हळदीचे बियाणे आणून दहा गुंठ्यामध्ये लागवड केली होती.
advertisement
हळदीची लागवड केल्यावर कोणकोणते रोग पडतात, कोण कोणती फवारणी घ्यावी लागते याची सर्व माहिती सिताराम यांना मिळाली. तसेच आपल्या येथील हवामान आणि जमीन यावरही हळदी येते का नाही याचीही माहिती मिळावी म्हणून त्यांनी याची लागवड केली होती. जवळपास हळदीचा एक गठ्ठा 800ते 900 ग्रॅमपर्यंत वजन भरत आहे.
सध्या या हळदीची विक्री सांगली येथे करत आहे. तर सांगली येथे हळदीला भाव 3 हजार रुपयेपासून ते 10 हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. तर दहा गुंठ्यामध्ये लागवड केलेल्या हळदीच्या विक्रीतून सिताराम यांना लागवडीचा खर्च वजा करून 7 महिन्यांमध्ये एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांची काळी जमीन किंवा बागायत जमीन असेल त्यांनी पारंपारिक पिकाकडे नव्हता हळदीच्या पिकाची लागवड केल्यास भरघोस असा उत्पन्न मिळेल, असा सल्ला उच्चशिक्षित शेतकरी सिताराम पाटील यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 10 गुंठ्यात पिकवलं पिवळं सोनं, सात महिन्यांत लखपती, शेतकऱ्यानं कसा केला प्रयोग यशस्वी?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement