advertisement

आईनंच 16 वर्षाच्या लेकीला विकलं, पैशांसाठी लग्न लावलं, पण मुलगीच गायब, बीडमध्ये काय घडलं?

Last Updated:

Beed News: या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय. विशेष म्हणजे विवाहानंतर संबंधित मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे.  

आईनंच 16 वर्षाच्या लेकीला विकलं, पैशांसाठी लग्न लावलं, पण मुलगीच गायब, बीडमध्ये काय घडलं?
आईनंच 16 वर्षाच्या लेकीला विकलं, पैशांसाठी लग्न लावलं, पण मुलगीच गायब, बीडमध्ये काय घडलं?
बीड: आईनेच पैशांच्या मोहापायी आपल्या अल्पवयीन मुलीचा सौदा केला असून पैसे घेऊन तिचा विवाह लावून दिला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मुलगी 16 वर्षांची असताना पैसे घेऊन तिचे लग्न लावून देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय. विशेष म्हणजे विवाहानंतर संबंधित मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक फायद्यासाठी आईने एका व्यक्तीकडून पैसे स्वीकारून मुलीचे लग्न लावले. मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असतानाही हा निर्णय घेण्यात आला. विवाहानंतर मुलीला अज्ञात स्थळी पाठवण्यात आल्याची शक्यता असून मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही.
advertisement
या प्रकरणाची माहिती चाईल्ड हेल्पलाईन (1098) वर मिळताच प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. संबंधित यंत्रणांनी घटनेची गंभीर दखल घेत मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय केली आहेत. तसेच, या प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने संबंधित मुलगी आणि तिच्या आईला शोधून काढून त्यांना महिला पोलिसांच्या उपस्थितीत बालकल्याण समिती, बीड तसेच प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मुलीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तिचा जबाब नोंदवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
advertisement
या घटनेमुळे बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
आईनंच 16 वर्षाच्या लेकीला विकलं, पैशांसाठी लग्न लावलं, पण मुलगीच गायब, बीडमध्ये काय घडलं?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement