advertisement

Supriya Sule On Baramati Byelection: बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, ''काँग्रेसमुळे...''

Last Updated:

Baramati Byelection: बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार,  सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, ''काँग्रेसमुळे...''
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, ''काँग्रेसमुळे...''
मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिल्यानंतर महाविकास आघाडीत एक वाक्यता नसल्याचे आले. बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हटले की, माझ्यासाठी बारामती हा भावनिक भाग आहे. पवारांचे नाव मोठे आहे ते बारामतीकराच्या आशिर्वादाने आहे. अजितदादा हा मोठा भाऊ गमवला आह. त्यामुळे हा आमच्यासाठी मोठा विषय आहे. सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणाऱ्या सगळ्याच पक्षांचे आभार मानत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
advertisement
काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. राजकिय पक्षाने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा मुद्दा आहे. शरद पवार ज्यावेळी निवडणूकीला उभे राहिले तेव्हा आम्ही सगळ्यांशी बोललो आणि ती बिनविरोध झाली. काँग्रेससोबत कोण बोलले हे मला माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष हा भारतातील संविधानाच्या चौकटीत काम करणारा पक्ष आहे. मी काँग्रेसने दाखवलेल्या विश्वासामुळे जिंकून आले. आम्ही काँग्रेसच्या तालमीत तयार झालेलो आहोत. आज आपण जो मोकळा श्वास घेत आहोत, स्वातंत्र्य मिळालंय ते काँग्रेसमुळे घेत आहोत. त्यांच्या पक्षाचे मत असू शकेल.
advertisement
देशासाठी काँग्रेसने मोठं योगदान दिले आहे. त्यांचे योगदान नाकारुन चालणार नाही. लोकशाहीत लहान-मोठा पक्ष महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी म्हटले.

आता फक्त अर्जच दाखल केलाय....

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, संवाद असला पाहिजे, मी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला आहे. राजकारणात मतभेद असले तरी मनभेद असता कामा नये असे सु्प्रिया सुळे यांनी म्हटले. आता उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी चर्चा करून काही मार्ग काढता येऊ शकतो असेही त्यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule On Baramati Byelection: बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, ''काँग्रेसमुळे...''
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement