TRENDING:

Electric की Petrol, कोणती बाईक करते सर्वात जास्त बचत? जाणून व्हाल चकीत

Last Updated:
आजच्या काळात लोक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहेत. कारण पेट्रोल-डिझेलच्या किंमती या प्रचंड वाढत आहेत. दरम्यान काही लोकं कंफ्यूज असतात की, पेट्रोल बाइक जास्त फायदेशीर ठरते की इलेक्ट्रिक बाइक? तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
1/9
Electric की Petrol, कोणती बाईक करते सर्वात जास्त बचत? जाणून व्हाल चकीत
Electric vs Petrol Bike 2026: वाहन मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. लोकं हे पेट्रोल-डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक कार आणि बाइक्सला पसंती देत आहे. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी म्हणून प्रोत्साहन देतेय. आजच्या काळात बाइक खरेदी करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, इलेक्ट्रिक बाइक घ्यावी की पेट्रोल बाइक? खरंतर याचं उत्तर तुमच्या वापरावर अवलंबून आहे. पण तुम्ही शहरात रोज बाइक चालवत असाल तर आता इलेक्ट्रिक बाइक हा बेस्ट ऑप्शन ठरतेय.
advertisement
2/9
दोन्हीच्या खर्चात किती फरक? : इलेक्ट्रिक बाइकची सर्वात मोठी ताकद म्हणजे, ही बाइक वापरताना खर्च खुप कमी लागतो. इलेक्ट्रिक बाइक चालवण्यास जवळपास 0.15 ते 0.30 रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. तसंच पेट्रोल बाइकवर हा खर्च जवळपास 2 ते 3 रुपये प्रति किलोमीटर असतो. म्हणजेच तुम्ही रोज बाइक चालवत असाल तर वर्षभरात जवळपास 20 हजार ते 40 हजार रुपयांची बचत करू शकता.
advertisement
3/9
मेंटेनेंससाठी सोपी आणि स्वस्त कोणती? : इलेक्ट्रिक बाइकचं मेंटेनेन्स हे खुपच सोपं असतं. यात इंजिन ऑइल , क्चल प्लेट किंवा स्पार्क सारख्या गोष्टी नसतात. ज्यामुळे मेंटेनेंस कमी होते. इलेक्ट्रिक बाइकची वार्षिक सर्व्हिसिंग ही सामान्यतः 1,000 ते 2,500 रुपयां दरम्यान असते. तर पेट्रोल बाइकमध्ये हा खर्च 5 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त येऊ शकतो.
advertisement
4/9
शहरात चालवण्यासाठी बेस्ट कोणती? : शहराच्या ट्रॅफिकमध्ये इलेक्ट्रिक बाइक खुप स्मूद अनुभव देते. यात गियर बदलण्याचं टेन्शन नसतं. तसं लगेच पॉवर मिळते. सोबतच ही आवाजाशिवाय चालते. ज्यामुळे रायडिंग आरामदायक होते. तुम्ही ही बाइक घरीच चार्ज करू शकता. मात्र चार्जिंगसाठी 1.5 ते 6 तासांचा कालावधी लागू शकतो.
advertisement
5/9
दूरच्या प्रवासासाठी विश्वासार्ह : तुम्हाला दूरचा प्रवास करायचा असेलतर पेट्रोल बाइक अजुनही जास्त चांगला ऑप्शन आहे. एकता फूल टँक केल्यावर 250 ते 500 किलोमीटरपर्यंत आरामात चालवता येऊ शकते. काही मिनिटात पुन्हा फ्यूल भरू शकता. यासोबतच सुरुवाती किंमतही इलेक्ट्रिक बाइकच्या तुलनेत कमी असते.
advertisement
6/9
रोजच्या हिशोबाने निर्णय : इलेक्ट्रिक बाइक ही सामान्यः एकदा चार्ज केल्यावर 90 ते 160 किलोमीटरपर्यंत चालते. जी शहरात रोजच्या वापरासाठी बेस्ट ठरते. मात्र तुमच्याजवळ चार्जिंगची सुविधा नसेल तर तुम्ही जास्त दूरचं अंतर पार करत असाल तर अशावेळी पेट्रोल बाइक बेस्ट ठरते.
advertisement
7/9
पर्यावरणासाठी बेस्ट ऑप्शन : इलेक्ट्रिक बाइकमधून कोणताही धूर किंवा प्रदुषण होत नाही. ज्यामुळे शहरात प्रदुषण कमी होण्यात मदत होते. दीर्घकाळात हे तुमच्या कार्बन फुटप्रिंटलाही कमी करते. हा पर्यावरणाच्या हिशोबाने एक मोठा फायदा आहे.
advertisement
8/9
तुमच्या वापरावर अवलंबून आहे निर्णय : तुम्ही रोज 20-40 किलोमीटर शहरात बाइक चालवत असाल तर इलेक्ट्रिक बाइक तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. ही स्वस्त, सोपी आणि सुविधाजनक आहे.
advertisement
9/9
तसंच तुमचा वापर लांबच्या प्रवासासाठी जास्त असेल आणि चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसेल तर पेट्रोल बाइक अजुनही बेस्ट ऑप्शन आहे. 2026 मध्ये इलेक्ट्रिक बाइक आता फक्त ऑप्शन नाही तर शहरात वाहन चालवणाऱ्यांची पहिली पसंत बनतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Electric की Petrol, कोणती बाईक करते सर्वात जास्त बचत? जाणून व्हाल चकीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल