TRENDING:

PSL 2026 : साहिबजादा फरहानने घेतला बाबर आझमचा बदला? अर्ध्या पीचवरून स्मिथला माघारी पाठवलं, पाहा Video

Last Updated:

PSL 2026 Sahibzada Farhan denied single to Steve Smith : रविवारी खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये मुल्तान सुल्तान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील मॅचमध्ये फरहानने स्मिथला सिंगल घेण्यास नकार दिला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज काहीसा नाराज दिसला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
PSL 2026 Sahibzada Farhan Steve Smith : आयपीएलच्या पार्श्वभूमीवर पैसे कमवण्यासाठी पाकिस्तानने क्रिकेटने पीएसएलची सुरूवात केली होती. मात्र, दिवसेंदिवस पाकिस्तान सुपर लीग वादाच्या भोवऱ्यात दिसतीये. यंदाचा सीझन सर्वाधिक वादग्रस्त ठरलाय. बॉल टेम्परिंगपासून अनेक वाद पहायला मिळत आहेत. अशातच आता मुल्तान सुल्तान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील मॅचमध्ये फरहानने स्मिथसोबत जो प्रकार केला, ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
PSL 2026 Sahibzada Farhan denied single taken revenge
PSL 2026 Sahibzada Farhan denied single taken revenge
advertisement

स्मिथला सिंगल घेण्यास नकार

रविवारी खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये मुल्तान सुल्तान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील मॅचमध्ये फरहानने स्मिथला सिंगल घेण्यास नकार दिला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज काहीसा नाराज दिसला. जेव्हा स्मिथ फॉर्मात फलंदाजी करत होता. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर स्मिथला सिंगल घेऊन पुढच्या ओव्हरची स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती. मात्र, साहिबजादा फरहानने त्याला रन घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने स्मिथ नाराज झाला अन् मैदानातच त्याने राग व्यक्त केला. मैदानावरील स्मिथचे हावभाव पाहून तो या निर्णयावर फारसा खुश नसल्याचं स्पष्ट जाणवत होतं.

advertisement

बाबरचा बदला घेतला की काय?

फरहानने सिंगल घेण्यास नकार दिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांना बाबर आझमची आठवण आलीये. सोशल मीडियावरील चाहत्यांनी या घटनेची तुलना जानेवारी 2026 मध्ये बिग बॅश लीगमध्ये घडलेल्या एका जुन्या प्रसंगाशी केली आहे. त्यावेळी सिडनी सिक्सर्सकडून खेळताना स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला सिंगल देण्यास नकार दिला होता. त्यावर फरहानने बाबरचा बदला घेतला की काय? असा सवाल विचारला जातोय. 'पॉवर सर्ज' दरम्यान घडलेल्या त्या घटनेनंतर बाबर लवकरच आऊट झाला होता.

advertisement

फरहानने मद्दामहून केलं?

ज्याप्रमाणे स्मिथने बाबरला स्ट्राईक दिली नव्हती, तसेच आता त्याच्याच देशाच्या खेळाडूने स्मिथला स्ट्राईक नाकारली. त्यामुळे सोशल मीडियावर बाबर आझमचा बदला पूर्ण झाला, अशी चर्चा पाकिस्तानी क्रिकेटचे चाहते करत आहेत. पण फरहानने हे कृत्य मद्दामहून केलं का? असा प्रश्न देखील विचारला जातोय.

advertisement

PSL मध्ये राडा! मोईन अलीच्या अंगावर का धावून गेला? डेव्हिड वॉर्नरने सांगितलं खरं कारण? Video

मुल्तान सुल्तान्सला 167 रन्सचे टार्गेट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

स्मिथने क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध 35 बॉल्समध्ये 53 रन्सची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. मुल्तान सुल्तान्सने 167 रन्सचे टार्गेट दोन ओव्हर शिल्लक असतानाच पूर्ण केले, ज्यामुळे ते सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत.दुसरीकडे, साहिबजादा फरहानने देखील आपला जबरदस्त फॉर्म कायम राखला आहे. दुसऱ्या दिवशी त्याने रावळपिंडीविरुद्ध केवळ 38 बॉल्समध्ये 68 रन्स कुटले. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुल्तानने 183 रन्सचा पाठलाग केवळ 16.2 ओव्हरमध्येच यशस्वीपणे पूर्ण केला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL 2026 : साहिबजादा फरहानने घेतला बाबर आझमचा बदला? अर्ध्या पीचवरून स्मिथला माघारी पाठवलं, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल