TRENDING:

APMC Market: कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा

Last Updated:

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 1050 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 444 क्विंटल लिंबूस 3000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: आज 6 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 30 हजार 017 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 1 लाख 03 हजार 209 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास 1040 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी बाजारभाव मिळाला. तसेच बाजारातील उन्हाळी कांद्याचा सरासरी भाव 950 ते 1040 रुपये दरम्यान राहिला. लोकल कांद्याचा बाजारभाव 800 ते 2280 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे राहिला .
advertisement

लिंबूची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 1050 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 444 क्विंटल लिंबूस 3000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 21 क्विंटल लिंबूस 11771 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक 

View More

राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून मार्केटमधील द्राक्षाची आवक चांगली आहे. आज 1027 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 528 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 6250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक झालेल्या 35 क्विंटल द्राक्षास 8000 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आजचा द्राक्ष बाजार प्रतिक्विंटलमागे 300 रुपयांनी घसरला.

advertisement

केळीची आवक 

मुंबई मार्केटमध्ये 19 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2400 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची 267 क्विंटल केळीची एकूण आवक राहिली. यापैकी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 180 क्विंटल केळीस 1500 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम द्राक्षासह केळी उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहे. परिणामी केळीच्या उत्पादन खर्चावर 30 टक्के वाढ झाली. तसेच निर्यात बंद असल्याने क्विंटलमागे 800 रुपयांपर्यंत फटका बसत असल्याचे केळी शेतकरी सांगत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल