TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : संपूर्ण सीझन जे जमलं नाही ते राकेश बापटने 'तिकिट टू फिनाले'साठी करून दाखवलं, प्रेक्षकही शॉक, VIDEO

Last Updated:

राकेश बापटला संपूर्ण सीझन जे जमलं नाही ते त्याने सीझनच्या शेवटी करून दाखवलं. राकेशचं हे रूप पाहून प्रेक्षकही शॉक झालेत. राकेशने असं केलं काय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठीच्या घरात आता अंतिम टप्प्याची जोरदार चुरस सुरू झाली आहे. तिकिट टू फिनाले मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात एक महत्त्वाचा महाटास्क पार पडताना दिसत आहे ज्यामध्ये राकेश बापटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राकेश बापटला संपूर्ण सीझन जे जमलं नाही ते त्याने सीझनच्या शेवटी करून दाखवलं. राकेशचं हे रूप पाहून प्रेक्षकही शॉक झालेत. राकेशने असं केलं काय?
News18
News18
advertisement

तिकिट टू फिनाले मिळवण्यासाठी स्पर्धकांना एक कठीण आणि आव्हानात्मक टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये कोळ्याचं महाकाय जाळं पार करत 7 प्रश्नांची अचूक उत्तरं देणं आवश्यक होतं. टास्कची रचना पाहता तो केवळ शारीरिकच नाही तर मानसिक ताकदीचीही परीक्षा घेणारा होता.

( Bigg Boss Marathi 6 : रुचिताचे तन्वीवर खळबळजनक आरोप, आता प्रभूनेही सगळं सांगितलं )

advertisement

प्रोमोमध्ये तन्वी आणि राकेश बापट हे दोघेही हा टास्क पूर्ण करताना दिसत आहेत. कोळ्याच्या जाळ्यातून मार्ग काढताना दोघेही अक्षरशः थकून गेले.  प्रत्येक पावलावर अडथळे पार करत ते पुढे सरकत टास्क पूर्ण केला. विशेष म्हणजे संपूर्ण सीझनभर राकेश बापटच्या कामगिरीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्याच्या काही निर्णयांमुळे टास्क रद्द करावे लागले. तर काही वेळा टास्क पूर्ण होता होता राहिला. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील झाली होती. मात्र अंतिम टप्प्यात त्याने दाखवलेली जिद्द आणि प्रामाणिकपणा यामुळे त्याची इमेज बदलताना दिसत आहे.

advertisement

राकेश बापटनं कोणतेही आढेवेढे न घेता टास्क पूर्ण केला. टास्कदरम्यान राकेश बापटचा एक इमोशनल क्षण पाहायला मिळाला. टास्क पूर्ण केल्यानंतर तो थकून खाली झोपतो आणि म्हणतो, "टास्क कम्प्लीट केला. This is for you बाबा... मेजर पद्माकर बापट... जय हिंद." शेवटच्या टास्क राकेश त्याच्या वडिलांसाठी खेळला.

सीझनमधील सर्वात महत्त्वाच्या टास्कमध्ये राकेशने दाखवलेली कामगिरी ही त्याच्या प्रवासातील टर्निंग पॉइंट ठरू शकते. प्रेक्षकांकडूनही त्याचं जोरदार कौतुक होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्या प्रयत्नांचं समर्थन करत, "हा खरा राकेश आहे", "छान खेळला. पूर्ण सीजनचा एकच टास्कमध्ये वसूल केला", अशा कमेंट्स प्रोमोवर पाहायला मिळत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
10 गुंठ्यात पिकवलं पिवळं सोनं, सात महिन्यांत लखपती, शेतकऱ्यानं कसा केला प्रयोग यशस्वी?
सर्व पहा

आता या महाटास्कनंतर तिकिट टू फिनालेचा मानकरी कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राकेश बापटची ही कामगिरी त्याला ट्रॉफीपर्यंत नेईल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : संपूर्ण सीझन जे जमलं नाही ते राकेश बापटने 'तिकिट टू फिनाले'साठी करून दाखवलं, प्रेक्षकही शॉक, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल